इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी (28 मे) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. टॉप फोरमधील पहिल्या दोन संघात अर्थात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघ हे अत्यंत तुल्यबळ असून अंतिम सामन्याचा निकाल काय लागेल? याचे आडाखे बांधले जात आहेत. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांनी मुंबई येथे धडक कारवाई करताना या अंतिम सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांवर कारवाई केली आहे.
भारतात सट्टेबाजी अवैध असली तरी अनेक सट्टेबाज व बुकी सोप्या पद्धतीने या गोष्टी करत असतात. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मुंबई येथील मीरा रोड परिसरात नवाघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून महाराष्ट्र पोलिसांनी काही साहित्य हस्तगत केले आहे. या प्रकरणात कोणालाही अटक झाली नसली तरी, या साहित्यावरून येथे सट्टेबाजी केली जात असल्याचे स्पष्ट होते.
पोलिसांनी त्या ठिकाणावरून मोबाईल व लॅपटॉपसह काही इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवल्या. तसेच मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पाच बुकींवर विविध कलमांतर्गत गुन्हे नोंद केले आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यानंतर ही कारवाई झाली.
त्याचवेळी या अंतिम सामन्याविषयी बोलायचे झाल्यास, पावसामुळे खेळ वेळेवर सुरू होऊ शकला नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 9.30 पर्यंत खेळ सुरू झाला तर पूर्ण षटके खेळण्यात येतील. मध्यरात्री 12.05 मिनिटांपर्यंत खेळायला सुरुवात झाली नाही तर सोमवारी (29 मे) हा अंतिम सामना खेळवण्यात येईल. सोमवारी देखील पाऊस राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात येईल.
(Maharashtra Police Raid On Betting Bookies Before IPL 2023 Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मानलं रे पठ्ठ्या! सराव सत्रातच दुबेचा राडा, IPL फायनलमध्ये होणार तांडव; मोठा विक्रम निशाण्यावर, Video
आयपीएल फायनलपूर्वीच सीएसकेच्या महत्वपूर्ण सदस्याने म्हटले ‘थँक्यू’, भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले…