---Advertisement---

सोलापूरमध्ये क्रिकेटचा मोठा सामना, हा भारतीय क्रिकेटर दिसणार ॲक्शनमध्ये

On: मंगळवार, जानेवारी 28, 2025 12:03 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी सोलापूरच्या क्रीडाप्रेंमीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जे की येत्या 30 जानेवारी ते 02 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा संघात इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमवर रणजी सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय खेळाडू ऋतुराज गायकवाडसोबत आयपीएलमधील काही स्टार्स खेळताना दिसणार आहेत.

क्रिकेटचा थरार अनुभवण्याची सोलापूरकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. नुकतेच नूतनीकरण झालेल्या या मैदानावर या दोन्ही संघात जोरदार सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू काल सोमवार (27 जानेवारी) रोजी सोलापूरात दाखल झाले आहेत. बीसीसीआय आयोजित रणजी ट्राॅफीतील शेवटचा ग्रुप सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजनाची संधी सोलापूरला देण्यात आली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघ ऋतुराज गायकवाड (कर्णधार), निखिल नाईक (उपकर्णधार आणि विकेटकीपर), अंकित बावणे, सचिन धस, रजनीश गुरबानी, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सत्यजीत बच्चाव, मंदार भंडारी, प्रदीप दाधे, रामकृष्ण घोष, हर्षल केट, अजीम काजी, मुर्तजा ट्रंकवाला, सिद्धेश वीर आणि हितेश वाळुंज

त्रिपुरा क्रिकेट संघ – मनदीप सिंग (कर्णधार), मनीशंकर मुरासिंग (उपकर्णधार), जीवनजोत सिंग, राणा दत्ता, सौरभ दास, श्रीनिवास शरथ (यष्टीरक्षक), बिक्रमकुमार दास, अजय सरकार, जॉयदीप बनिक (यष्टीरक्षक), बिक्रमजीत देबनाथ, शंकर पॉल, परवेझ सुलतान, श्रीदाम पॉल, संदीप सरकार, तेजस्वी जयस्वाल

हा सामना चार दिवसीय असणार आहे. जो की 30 जानेवारी ते 02 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. सामन्यापूर्वी दोन्ही संघ 28 आणि 29 जानेवारी रोजी सकाळ व दुपराच्या सत्रात सराव करणार आहेत. सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची फलंदाजी प्रमुख आर्कषण असणार आहे. ज्यामुळे सोलापूरकर हा सामना आणि लाडक्या ऋतुराज पाहण्यासाठी गर्दी करतील.

हेही वाचा-

आयसीसीचे अध्यक्ष जय शहा कुटुंबासह कुंभमेळयात, घेतला संतांकडून आशीर्वाद, पाहा VIDEO
IND VS ENG; तिसऱ्या टी20 सामन्यातूनही मोहम्मद शमी वगळला जाणार? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
‘310 भारतीय रुपये’, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या तिकिट विक्रीची तारीख जाहीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---