श्रीलंका संघाने गेल्या काही वर्षात निराशाजनक कामगिरी केली आहे. नुकताच संपन्न झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत विश्वविजेत्या श्रीलंका संघाला पात्रता फेरीतील सामने खेळावे लागले होते. त्यानंतर या संघाला उपांत्य फेरीत देखील प्रवेश करता आला नव्हता. येत्या काही महिन्यात आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून श्रीलंका क्रिकेटने मोठा निर्णय घेतला आहे.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत श्रीलंका संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यासाठी माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज महेला जयवर्धनेला एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील एका वर्षासाठी तो श्रीलंका संघाचा सल्लागार प्रशिक्षक म्हणून कामकाज पाहणार आहे. श्रीलंका क्रिकेटने सोमवारी (१३ डिसेंबर) प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, “माहेला जयवर्धने ‘हाय परफॉर्मन्स सेंटर’मध्ये खेळाडू आणि व्यवस्थापन संघाला महत्त्वाच्या सूचना देतील.”
महेला जयवर्धनेने गेली काही वर्ष मुंबई इंडियन्स संघाला प्रशिक्षण दिले आहे. श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने श्रीलंका क्रिकेटच्या तांत्रिक सल्लागार समितीशी सल्लामसलत करून ही भूमिका त्याला सोपवली आहे.
श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, “महेला मोठ्या भूमिकेत श्रीलंका संघासोबत जोडला जातोय, ही आनंदाची बाब आहे. २०२२ मध्ये श्रीलंकेचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. त्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे.”
नुकताच संपन्न झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत त्याची श्रीलंका संघाचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Mahela Jayawardena is set to take up a coaching role with Sri Lanka 🙌
Details 👇https://t.co/rgcDUBmA0E
— ICC (@ICC) December 13, 2021
ही जबाबदारी मिळाल्यानंतर महेला जयवर्धनेने म्हटले की, “राष्ट्रीय क्रिकेटपटू आणि आमच्या विभिन्न संघातील प्रशिक्षकांसोबत काम करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. ज्यामध्ये १९ वर्षाखालील आणि ‘अ’ संघाचा समावेश आहे. माझी मुख्य भूमिका, आपल्या संघातील मुख्य प्रशिक्षकांना आणि सपोर्ट स्टाफ मधील सदस्यांना मदत करण्याची असणार आहे. मला विश्वास आहे की, भविष्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण कामगिरी करून आम्ही भविष्यात यश मिळवू शकतो.”
महत्वाच्या बातम्या :
रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर! आता उपकर्णधारपदासाठी ‘हे’ आहेत ३ पर्याय
काळजाचा थरकाप उडवणारे ‘या’ दोनच कसोटी सुटल्या बरोबरीत; एकात भारतीय संघाचाही समावेश
विराट आणि रोहित दक्षिण आफ्रिकेत जाऊनही एकत्र खेळणार नाही? नक्की काय आहे कारण, वाचा