---Advertisement---

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून स्टिव्ह स्मिथ बाहेर? ‘या’ कारणामुळे अर्ध्यातून सोडले सराव सत्र

On: मंगळवार, डिसेंबर 15, 2020 8:07 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वनडे आणि टी२० क्रिकेट मालिका पूर्ण झाल्यानंतर १७ डिसेंबरपासून दोन्ही संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. तत्पुर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करत आहेत. मात्र मंगळवारी (१५ डिसेंबर) झालेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या महत्त्वपूर्ण सराव सत्रामध्ये विस्फोटक फलंदाज स्टिव्ह स्मिथ गैरहजर होता. कंबरेवर सूज आल्यामुळे त्याने या सराव सत्रात भाग घेतला नसल्याचे म्हटले जात आहे.

केवळ १० मिनिटे केला सराव
माध्यमातील वृत्तानुसार, स्मिथने सराव सत्रात जवळपास १० मिनिटे आपल्या संघसहकाऱ्यांसोबत वार्म अप केला. ज्यामध्ये स्ट्रेचिंग या व्यायामाचा समावेश होता. दरम्यान चेंडू उचलताना त्याच्या कंबरेला वेदना झाल्या. त्यामुळे फुटबॉल सत्रात तो सहभागी झाला नाही आणि सरळ ड्रेसिंग रुममध्ये गेला. अशात स्मिथ पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना दिसेल का नाही?, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

वनडे मालिकेत ठरला मालिकावीर
आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मिथने वनडे मालिकेत लौकिसास साजेशी फलंदाजी केली होती. भारताविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने २-१ ने विजय मिळवला होता. या पूर्ण मालिकेत स्मिथने भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. त्याला त्याच्या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

सगळे आहेत फक्त तुझीच कमी..! भारताच्या ‘या’ प्रमुख गोलंदाजाच्या अनुपलब्धतेबाबत रहाणेचे मोठे विधान

चुकीसाठी क्षमस्व! संघसहकाऱ्यावर हात उगारल्यानंतर मुशफीकूर रहीमने मागितली माफी

‘सिक्सर किंग’ युवराज मैदानावर परतणार! ‘या’ स्पर्धेत होणार सहभागी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---