क्रिकेटमध्ये अनेकदा असे काही क्षण पाहायला मिळतात, ज्याने पाहणाऱ्याचीही झोप उडाल्याशिवाय राहत नाही. काही खेळाडू अविश्वसनीय क्षेत्ररक्षण करतात, पण काही वेळा असेही होते की, खेळाडू चेंडू पकडताना मोठी चूक करून बसतो. महिला आशिया चषक 2022मध्येही असेच काहीसे घडले आहे. या स्पर्धेत मलेशिया संघाच्या एका खेळाडूने मोठी चूक केली आहे. त्यामुळे संघाला फुकटच्या चार धावा द्याव्या लागल्या आहेत.
झाले असे की, रविवारी (दि. 9 ऑक्टोबर) मलेशिया आणि थायलंड संघात महिला आशिया चषक 2022चा 16वा सामना खेळण्यात आला. यामध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला थायलंड संघ चांगली फलंदाजी करत होता. यावेळी नूर अरियाना नात्स्या 13वे षटक टाकण्यासाठी आली. षटकातील चौथ्या चेंडूवर थायलंडची महिला फलंदाज एन कोंचारोएनकाई (N Koncharoenkai) हिने एक शॉट मारला आणि चेंडू थेट सीमारेषेच्या दिशेने गेला.
यावेळी तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच, सीमारेषेच्या आधीच चेंडू आतल्या बाजूला फेकला. या प्रयत्नात तिने डाईव्ह मारली आणि सीमारेषेच्या पलीकडे गेली. इथपर्यंत तिचा प्रवास चांगला होता. मात्र, त्यानंतर तिने फेकलेला चेंडू सीमारेषेला शिवणार होता. त्यावेळी दुसरी खेळाडूही चेंडूपर्यंत पोहोचणार होती, तेवढ्यात पहिल्या खेळाडूने सीमारेषेच्या बाहेर असूनही चेंडू आतल्या बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला.
https://twitter.com/GemsOfCricket/status/1579353402240557057
दोरीच्या बाहेर असूनही चेंडू शिवल्यामुळे क्रिकेट नियमांनुसार थायलंडला चौकार मिळाला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहतेही खेळाडूंच्या निष्काळजीपणाची थट्टा उडवत आहेत. या व्हिडिओला 1000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
सामन्याबद्दल थोडक्यात
या सामन्यात मलेशिया संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या थायलंड संघाने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 115 चोपल्या. एवढ्या कमी धावसंख्येचे आव्हानही मलेशिया संघाला पार करता आले नाही. मलेशिया संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावत 65 धावाच करू शकला. अशाप्रकारे थायलंड संघाने हा सामना 50 धावांनी आपल्या नावावर केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भावा त्याने 700 गोल केलेत, रन नाही’, रोनाल्डोला शुभेच्छा देऊन युवराजने मारली स्वत:च्या पायावर कुऱ्हाड
‘काहीतरी करूनच ये, नाहीतर…’, शाहबाजच्या वडिलांनी दिली होती क्रिकेटपटूला ताकीद, आता सगळीकडं गाजतोय