---Advertisement---

अवघड आहे! करोडपती मलिंगा गेल्या दहा वर्षात भेटला नाही जन्मदात्या आई-बापाला

On: बुधवार, सप्टेंबर 15, 2021 12:18 PM
---Advertisement---

श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू लसिथ मलिंगाने मंगळवारी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मलिंगाने आत्तापर्यंत मोठे यश मिळवले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये महान गोलंदाजांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. त्यामुळे जगभरातील अनेक टी२० क्रिकेट स्पर्धांसाठीही त्याला मागणी असते.

त्यामुळे आत्तापर्यंत मलिंगाने कोट्यावधी रुपये कमावण्याबरोबरच जगभरात सन्मानही मिळवला आहे. पण असे असले तरी त्याच्यावर एका गोष्टीमुळे टीका होत असते. ती गोष्ट म्हणजे गेले जवळपास १०-११ वर्षे तो त्याच्या आई-वडीलांच्या घरी गेलेला नाही.

आई-वडीलांचा जगण्यासाठी संघर्ष 
विश्वचषकात दोन वेळा हॅट्रिक घेण्याची कामगिरी करणारा मलिंगा जरी कोट्यावधी रुपयांमध्ये खेळत असला तरी त्याच्या पालकांना मात्र जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्याची आई शिवणकाम करुन घर चालवते. तसेच त्याची आई पॉलिस्टरचे कपडे शिवते. मलिंगाच्या आई-वडीलांची आर्थिक स्थिती फार बिकट आहे.

इंडियन एक्सप्रेसने काही दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्तानुसार मलिंगाचे आई-वडील गॉल येथील रथगामा भागात राहातात. येथेच मलिंगाचे लहानपण गेले आहे. पण सध्या मलिंगा कोलंबो येथे राहातो. तो गेले जवळपास १० वर्षे त्याच्या आई-वडीलांच्या घरी गेलेला नाही.

मलिंगाची आई म्हणते, कदाचीत तो खुप व्यस्त असावा. त्याला कोलंबामधील जीवनशैली अधिक आवडत असेल. तो आनंदी आहे, तर आम्हीही आनंदी आहोत.

मलिंगाची कारकिर्द –
मलिंगाने श्रीलंकेकडून ३० कसोटी सामन्यात १०१ विकेट्स, २२६ वनडेत ३३८ विकेट्स तर ८४ टी२०मध्ये १०७ विकेट्स अशा एकूण ५४६ विकेट्स घेतल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा श्रीलंकेचा तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

मलिंगा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही आहे. त्याने २००८-२०१९ या काळात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना १२२ सामन्यात १७० बळी आपल्या नावे केले आहेत. यादरम्यान चार वेळ मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

महत्त्वाच्या बातम्या –

भारत-ऑस्ट्रेलिया फिलीप ह्युजेसला देणार श्रद्धांजली; डोक्याला चेंडू लागून झाला होता मृत्यू

‘तीन विश्वचषकात यष्टीरक्षण करायचे आहे’, भारतीय क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा

होय, आम्ही स्लेजिंग करणार! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे भारतीय संघाला खुले आव्हान

ट्रेंडिंग लेख –

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक जास्त वेळा नाबाद राहणारे ३ भारतीय फलंदाज

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टी२०त सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता दाखवणारे टीम इंडियाचे ३ गोलंदाज

या पाच सामन्यात भारतीय अष्टपैलू खेळाडूंनी गाजवली होती ऑस्ट्रेलियाची मैदाने

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---