---Advertisement---

भावा, करुन दाखवलंस! दीपक चाहरचा विजयी चौकार बहिणीने केला कॅमेऱ्यात कैद; काढले गौरवोद्गार

On: गुरूवार, जुलै 22, 2021 8:35 AM
---Advertisement---

आर प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने रोमांचक विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून विजय मिळवत वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून देण्यात दीपक चाहरने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. अशातच त्याच्या बहिणीनेही व्हिडिओ शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.

दीपक चाहरची बहीण मालती चाहर हीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर दीपक चाहरच्या विजयी चौकाराचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर तिने कॅप्शन लिहिले की, “ओह, भावा तू करून दाखवलंस, भारतीय संघाला सामना जिंकून दिला आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनंही जिंकली. तू स्टार आहेस, असाच चमकत रहा.”

या व्हिडिओवर अनेक क्रिकेट चाहते आपल्या प्रतिक्रिया देऊन दीपक चाहरचे कौतुक करत आहेत.

या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंका संघाकडून चरिथ असलंकाने ६८ चेंडूत सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ६ चौकार लगावले होते. तसेच अविष्का फर्नांडोने ५० धावांची खेळी केली. तर, करूणारत्नेने ३३ चेंडूत ५ चौकारांच्या साहाय्याने ४४ धावांचे योगदान दिले होते. श्रीलंका संघाला ५० षटकाअखेर ९ बाद २७५ धावा करण्यात यश आले होते. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या आणि दीपक चाहरे २ विकेट घेतल्या होत्या.

दीपक चाहरची तुफानी खेळी
या सामन्यात भारतीय संघाने २७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १९३ धावांवर ७ गडी गमावले होते. अशा बिकट परिस्थितीत दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी धैर्य न सोडता भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दीपक चाहरने या सामन्यात नाबाद ६९ धावांची खेळी केली होती. यासह त्याने भुवनेश्वर कुमारबरोबर(१९*) नाबाद ८४ धावांची भागीदारी केली होती.

त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघाने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना २३ जुलै रोजी खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय संघाच्या विजयानंतर ‘गुरू’ राहुल द्रविड भलतेच खुश, ‘या’ शब्दात केले खेळाडूंचे कौतुक; पाहा व्हिडिओ

श्रीलंकेविरुद्ध रोमांचक विजयानंतर टीम इंडियाची हॉटेलमध्ये रंगली ‘संगीत मैफील’, व्हिडिओ प्रचंड व्हायरल

धोनीने लिहिली धवनसेनेच्या वनडे मालिका विजयाची गाथा! भुवनेश्वर अन् दिपकला ‘असे’ केले तयार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---