बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेची (भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिका) पहिली लढत अत्यंत रोमांचकारी राहिली. ऍडलेड येथे झालेल्या या लढतीच्या पहिल्या डावाखेर आघाडीवर असेलला भारतीय संघ सामन्याच्या शेवटी विजयाचे रणशिंग फुंकेल, असे सर्वांना वाटत होते. पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पूर्ण सामना त्यांच्या बाजूने पालटला. परिणामत: ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने विजयी पताका झळकावली.
त्यानंतर दोन्ही संघ २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरु होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याची तयारी करत आहेत. अशात या सामन्यात सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूला विशेष मेडलने गौरविण्यात येणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना ३० डिसेंबरला संपेल. या सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणजेच सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला ‘मुलाग’ मेडल देण्यात येईल. तब्बल १५२ वर्षांपुर्वी ऑस्ट्रेलिया संघाचे दिग्गज कर्णधार जॉनी मुलाग यांच्या स्मरणार्थ या मेडलला मुलाग मेडल असे नाव देण्यात आले होते.
जॉनी मुलाग यांच्याविषयी थोडेसे
अष्टपैलू खेळाडू जॉनी मुलाग परदेश दौऱ्यावर जाणारे पहिले ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरले होते. १८६८ साली पहिल्यांदा त्यांच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. मुलाग यांंनी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण ४५ सामने खेळले होते. दरम्यान त्यांनी ७१ डावात फलंदाजी करताना २३च्या सरासरीने १६९८ धावा केल्या होत्या. तसेच त्यांनी १८७७ षटके गोलंदाजी केली होती. यात ८३१ निर्धाव षटके टाकत २५७ विकेट्सची आपल्या खात्यात नोंद केली होती.
एवढेच नव्हे तर, त्यांनी काही सामन्यात यष्टीरक्षकाची भूमिका निभावली होती आणि ४ फलंदाजांना यष्टीचीत केले होते. १८६६ साली त्यांनी मेलबर्नच्या मैदानावर एक ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामनाही खेळला होता.
The best player in the Boxing Day Test will be awarded the Mullagh Medal, named after the legendary Johnny Mullagh, captain of the 1868 cricket team who became the first Australian sporting team to tour internationally! #AUSvIND pic.twitter.com/3Ymx3QE4dS
— Cricket Australia (@CricketAus) December 21, 2020
Mullagh’s impact on the 1868 tour of the UK:
✅ 45 matches
✅ 1698 runs (71 innings)
✅ 1877 overs bowled (831 maidens)
✅ 257 wickets @ 10
✅ 4 stumpingsMullagh also played in the 1866 Boxing Day match at the @MCG, and worked for the MCC in 1869/70 season! pic.twitter.com/fXk7WK2VI6
— Cricket Australia (@CricketAus) December 21, 2020
‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याचा इतिहास
दरवर्षी २६-३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्याला ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना म्हटले जाते. ख्रिसमस बॉक्स (नाताळाची भेट) या शब्दावरुन ‘बॉक्सिंग डे’ हा शब्द तयार झाला आहे. नाताळाच्या दुसऱ्या दिवशी अधिकतर देशात सुट्टी असते. या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन भेटवस्तू देण्याची प्रथा असते.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पुनरागमन करणे कठीण, पाहा काय सांगते आकडेवारी
ऍडलेड कसोटी सामन्यात का घातले होते शमीने फाटलेले शूज? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले कारण
हॅप्पी बर्थडे डार्लिंग..! पत्नी रितिकाच्या वाढदिवसानिमित्त रोहितची सुपर’हिट’ पोस्ट