इंग्लंडमधील व्यवसायिक क्रिकेट स्पर्धा असलेल्या द हंड्रेड या लीगच्या दुसऱ्या हंगामाचा एलिमिनेटर सामना शनिवारी (26 ऑगस्ट) पार पडला. या सामन्यात मँचेस्टर ओरिजिनल्स आणि सदर्न ब्रेव्हज हे संघ आमने-सामने आले. 100 चेंडूंच्या या सामन्यात ब्रेव्हजने मँचेस्टरसमोर ठेवलेल्या 197 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना, मँचेस्टरचा कर्णधार जोस बटलर याने वादळी खेळी करताना संघाला अंतिम फेरीत नेले.
गुणतालिकेत पहिले स्थान पटकावून ओव्हल इन्विन्सिबल हा संघ यापूर्वीच अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्यानंतर साखळी फेरी दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिलेल्या मँचेस्टर व ब्रेव्हज यांच्यातील या सामन्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर ब्रेव्हज संघासाठी सलामीवीर डेव्हॉन कॉनवे व फिन ऍलन यांनी वादळी सुरुवात केली. या जोडीने केवळ 65 चेंडूंमध्ये 122 धावा कुटल्या. ऍलन 38 चेंडूंमध्ये सहा चौकार व पाच षटकारांच्या मदतीने 69 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेम्स विन्स याने डोळ्याचे पारणे फेडणारी फटकेबाजी करत केवळ 25 चेंडू नाबाद 56 धावा करत संघाला 196 पर्यंत मजल मारून दिली. कॉनवेने 38 चेंडूवर 51 धावा केल्या.
स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या पार करण्याचे आव्हान मँचेस्टर संघासमोर होते. मँचेस्टर संघासाठी कर्णधार बटलर व फिल सॉल्ट यांनी अवघ्या 32 चेंडूत 82 धावा तडकावल्या. सॉल्ट याने 17 चेंडू 47 धावांची वादळी खेळी केली. हॉडेननेही 31 धावा काढल्या. मात्र, मँचेस्टर संघाचा विजय सुक्कर केला कर्णधार बटलर याने. त्याने सहा चौकार व चार षटकारांच्या मदतीने 46 चेंडूत 82 धावा केल्या. अखेर लॉरीने 22 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
रविवारी अंतिम सामन्यात व मँचेस्टर हे संघ आमने-सामने येतील. तर महिलांच्या अंतिम सामन्यात सदर्न ब्रेव्हज व नॉदर्न सुपरचार्जर्स भिडणार आहेत.
(Manchester Originals Beat Southern Braves And Entered In The Hundred Final Buttler His 82)
महत्वाच्या बातम्या-
‘मी जे पाहिलंय, त्यावरून हे स्पष्ट आहे…’, विराटच्या बॅटिंगविषयी माजी कोचचे सनसनाटी वक्तव्य
बोंबला! World Cup 2023 तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी वेबसाईट क्रॅश, भारतीय सामन्यांची बुकिंग कधी?