जगभरात सध्या एकच आवाज आहे, तो म्हणजे टोकियो ऑलिंपिक २०२० चा. यातील दुसऱ्या दिवशी शनिवारी (२४ जुलै) मीराबाई चानूने वेट लिफ्टिंगमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. यानंतर आता टेबल टेनिस खेळातूनही भारतासाठी आनंदाची बातमी येत आहे. भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन संघात टेबल टेनिसच्या महिला एकेरीत भारताची अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बत्राने टिनटिन हो हिला पहिल्या राऊंडमध्ये ४-० ने पराभूत केले आहे.
मनिकाने टिनटिनला ११-७, ११-६, १२-१० आणि ११-९ने धूळ चारली आहे. आता ती उद्या म्हणजेच रविवारी (२५ जुलै) दुसऱ्या राऊंडमध्ये युक्रेनच्या मार्गारेटा पेसोत्स्काचा सामना करणार आहे.
Table Tennis: Manika Batra got the better of WR 94 Tin Tin Ho (GBR) 4-0 in the opening round.
Its 3rd consecutive win for Manika against the British player.
Next she will take on WR 32 Margaryta Pesotska of Ukraine. #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/R05sskjrlt— India_AllSports (@India_AllSports) July 24, 2021
विशेष म्हणजे मनिकाला सन २०२० मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताच्या अपेक्षांवर पाणी! चीनविरुद्ध टेबल टेनिसच्या मिश्र गटात शरत अन् मनिका पराभूत
-भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर ३-२ ने दणदणीत विजय, गोलकिपर श्रीजेश ठरला नायक
-भारतीय नेमबाज सौरभ चौधरी चमकला, १० मी. एयर पिस्टल अंतिम फेरीचे मिळवले तिकीट