आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामाला सुरुवात होण्यास तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तत्पूर्वी, सर्व संघांची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली असून, सध्या गुणतालिकेत अखेरच्या स्थानी असलेल्या सनरायझर्स हैदराबादणे खेळाडू देखील मैदानावर चांगलाच घाम गाळत आहेत. संघाचा अनुभवी फलंदाज मनिष पांडे हा देखील सरावात उत्तुंग फटके मारताना दिसला. त्याचा एक मजेदार व्हिडीओ सनरायझर्सने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट केला आहे.
पांडेने शोधला हरवलेला चेंडू
सनरायझर्स हैदराबादने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये, मनीष पांडेने सरावादरम्यान एक उत्तुंग षटकार खेचला. त्याने मारलेला चेंडू मैदानाबाहेरील झुडपांमध्ये गेला. विशेष म्हणजे त्यानंतर स्वतः पांडेने टॉर्चच्या मदतीने हा चेंडू शोधून काढला. या व्हिडिओला ‘ज्याने चेंडू मारला त्याने शोधून आणायचा’ असे मजेदार कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या गमतीदार प्रतिक्रिया येत आहेत.
Who hits the ball will find the ball 🤭#OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021 pic.twitter.com/C5lzGjoAgD
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 15, 2021
पहिल्या टप्प्यात केली चांगली कामगिरी
आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा ३२ वर्षीय मनीष पांडेसाठी चांगला गेला होता. पांडेने पाच सामन्यांत ४८.२५ च्या सरासरीने १९३ धावा केल्या. मात्र, या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट चर्चेचा विषय राहिला. त्याने १२० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्याने, अनेकांनी त्याला ट्रोलदेखील केले. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्याला चांगली कामगिरी करून संघाच्या विजयात हातभार लावण्याची संधी त्याला असेल.
सनरायझर्स गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर
आयपीएल २०१६ चा विजेता संघ असलेला सनरायझर्स हैदराबाद सध्या गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर आहे. पहिल्या सात सामन्यांपैकी त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळवता आलेला. आता उर्वरित सर्व सामने जिंकल्यानंतरच ते प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतात. सनरायझर्स संघ व्यवस्थापनाने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ६ सामन्यांनंतर डेव्हिड वॉर्नरला कर्णधार पदावरून कमी करत केन विलियम्सनच्या हाती नेतृत्व सोपविले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट सोडणार टी२० कर्णधारपद; पाहा आत्तापर्यंत कशी राहिली कामगिरी
भारताची पुढील पिढी घडवणार ‘लेफ्टनंट कर्नल धोनी’, संरक्षण मंत्रालयाने दिली ‘ही’ जबाबदारी
बिग ब्रेकिंग! विराट कोहली देणार टी२० कर्णधारपदाचा राजीनामा, भावनिक पोस्टसह केली घोषणा