---Advertisement---

आयपीएल 2023च्या लिलावात मनीष पांडेवर दिल्लीने केली पैशांची उधळण, बेस प्राईजपेक्षा दुप्पट रक्कम खिशात

On: शुक्रवार, डिसेंबर 23, 2022 6:19 PM
Manish-Pandey
---Advertisement---

कोची येथे शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) आयपीएल 2023चा मिनी लिलाव पार पडला. या मिनी लिलावात काही खेळाडूंची चांदी झाली, तर काही खेळाडूंना मूळ किंमती इतकेही पैसे मिळाले नाहीत. मात्र, काही असेही खेळाडू होते, ज्यांना मूळ किंमतीपेक्षा दुप्पट रुपये मिळाले. त्या खेळाडूंमध्ये मनीष पांडे याच्या नावाचाही समावेश होतो. मनीषला त्याच्या मूळ किंमतीपेक्षा एक कोटी 40 लाख रुपये जास्त मिळाले.

मनीष पांडे (Manish Pandey) याला आयपीएल 2023च्या मिनी लिलावात तब्बल दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने ताफ्यात सामील केले. दिल्लीने त्याला 2.40 कोटी रुपयात आपल्या संघात घेतले. विशेष म्हणजे, मागील हंगामातील लिलावाच्या तुलनेत मनीष पांडेला यावेळी खूपच कमी रक्कम मिळाली.

मागील हंगामात मनीषला लखनऊ सुपर जायंट्स संघाने 4.60 कोटी रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी त्याची मूळ किंमत ही 1 कोटी इतकीच होती. त्या हंगामात मनीषने फक्त 6 सामन्यात फलंदाजी करताना फक्त 88 धावा केल्या होत्या.

मनीषची आयपीएल कारकीर्द
मनीषच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 160 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29.90च्या सरासरीने 3648 धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 21 अर्धशतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे, नाबाद 114 ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. (cricketer Manish Pandey goes to Delhi Capital for 2.4 Crore rupees)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 40 लाखांच्या शिवम मावीला गुजरातने बनवले ‘एवढ्या’ कोटींचा मालक, तरीही गडी तोट्यातच
आयपीएल 2023च्या मिनी लिलावात ‘हे’ चार खेळाडू मालामाल, मिळाली 15 कोटींहून अधिक रक्कम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---