---Advertisement---

टीम इंडियाच्या या खेळाडूच्या आहेत ५ गर्लफ्रेंड्स, बायको आसपास नसताना…

On: बुधवार, मे 20, 2020 2:22 PM
---Advertisement---

नवी दिल्ली । भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेने मजेशीर अंदाजात म्हटले की, त्याच्या बॅगमध्ये ५ गर्लफ्रेंड्स आहेत. खरंतर पांडेने आपल्या बॅटची तुलना आपल्या गर्लफ्रेंडशी केली आहे. कर्नाटकच्या या खेळाडूने म्हटले की, तो आपल्या बॅटबरोबर आपल्या गर्लफ्रेंडसारखा व्यवहार करतो.

तसेच तो पुढे म्हणाला की, तो जितके प्रेम त्याची पत्नी अश्रिता शेट्टीशी (Ashrita Shetty) करतो, तितकेच प्रेम तो आपल्या बॅटबरोबरही करतो. डिसेंबर २०१९मध्ये पांडेने मुंबईमध्ये अभिनेत्री अश्रिताबरोबर लग्न केले होते.

बॅटबरोबर करतो भांडण-

पांडेने (Manish Pandey) खुलासा केला की, “जेव्हा त्याच्या बॅटच्या कोपऱ्याला चेंडू लागून जातो, तेव्हा तो बॅटशी भांडणदेखील करतो. त्याचे असे मत आहे की, सर्व बॅट गर्लफ्रेंड्स त्याच्यासाठी खास आहेत आणि त्यांच्यासाठी त्याच्या हृदयात वेगळी जागाही आहे.”

“ज्या बॅटने त्याने आयपीएलमध्ये शतकी खेळी केली होती, त्या बॅटचे नाव त्याने शॅडो बॅट ठेवले आहे. तो जेव्हाही नाराज होतो किंवा स्वत:ला कमकुवत समजतो, तेव्हा तो आपल्या शॅडो बॅटला आपल्या छातीच्या जवळ घेतो त्यानंतर तो ठीक होतो,” असेही त्याने पुढे सांगितले.

क्रिकबझच्या एका कार्यक्रमात पांडे म्हणाला की, “अनेक प्रकारे त्याच्याकडे असणाऱ्या बॅट्स त्याच्या गर्लफ्रेंडप्रमाणेच आहेत. विशेषत: जेव्हा तो सामने खेळत असतो आणि त्याची पत्नी आसपास नसते. त्याच्या बॅगमध्ये ५ गर्लफ्रेंड्स आहेत. सर्व वेगवेगळ्या प्रसंगांनुसार खास आहेत. जेव्हा विश्वास मिळवायचा असतो, तेव्हा तो ‘शॅडो’ बॅटचा (Shadow Bat) वापर करतो.”

मागील वर्षी २०१९च्या विश्वचषकानंतर पांडेला भारतीय संघात स्थान मिळाले. तरीही त्याला अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. तो न्यूझीलंड दौऱ्यात भारताच्या वनडे आणि टी२० संघाचा भाग होता.

मागील वर्षी त्याने विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीत संघाला विजय मिळवून दिला होता. विशेष म्हणजे टी२० स्पर्धा जिंकण्याच्या नंतर २४ तासांमध्ये त्याने अश्रिताबरोबर लग्न केले होते.

आयपीएलमध्ये (IPL) पांडे सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा भाग आहे.

त्याने भारतीय संघाकडून (Team India) आतापर्यंत २६ वनडे आणि ३६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत ४९२ आणि टी२०त ७०७ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-भारताचे 3 दिग्गज खेळाडू ज्यांनी आयपीएलचा अंतिम सामना न खेळताही पटकावले विजेतेपद

-ना विराट, ना रोहित, ना सचिन; फक्त विरुच्या नावावर आहे हा खास विक्रम

-१० भारतीय दिग्गज क्रिकेटपटू व त्यांच्या एक्स गर्लफ्रेंड्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---