भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे.या मालिकेतील पहिल्या टी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत १-० ने आघाडी घेतली आहे. तर दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. एकाच वेळी संघातील ७ खेळाडू आयसोलेशनमध्ये गेल्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला होता.
तसेच दुसरा टी -२० सामना आज (२८ जुलै) खेळला जाणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. आयसोलेशनमध्ये असलेल्या इशान किशनच्या संपर्कात आल्यामुळे संजू सॅमसन देखील या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. त्याच्या ऐवजी मनीष पांडेला यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडावी लागू शकते.
मनीष पांडे सध्या मध्यक्रमातील फलंदाजाची भूमिका पार पाडत आहे. परंतु, दुसऱ्या टी -२० सामन्यात तो यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो. त्याच्यासाठी हे काही नवीन नसणार आहे. देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये तो कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करतो. या संघाकडून खेळताना तो यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडतो. तसेच ही मालिका सुरू होण्यापूर्वी झालेल्या इंट्रास्क्वाड सराव सामन्यात तो आपल्या संघाकडून यष्टिरक्षण करताना दिसून आला होता.
मनीष पांडेने आतापर्यंत एकूण ३९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने ४४.३ च्या सरासरीने ७०९ धावा केल्या आहेत. यात त्याने ३ अर्धशतक झळकावले आहेत.
स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, जे खेळाडू कृणाल पंड्याच्या संपर्कात आले आहेत, त्यांची नावे अशाप्रकारे आहेत, युजवेंद्र चहल,हार्दिक पंड्या,सूर्यकुमार यादव, इशान किशन,पृथ्वी शॉ. या दौऱ्यावर बीसीसीआयने २० खेळाडूंचा संघ रवाना केला होता. यामध्ये ४ नेट गोलंदाजांचा ही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा एकदा मंधनाची तुफानी फलंदाजी, १५६ च्या स्ट्राईक रेटने धावा करत जिंकून दिला सामना
पुण्याचा ऋतुराज गायकवाड दुसऱ्या टी२० सामन्यातून पदार्पण करण्याची शक्यता, ‘हे’ आहे मोठे कारण
भारताच्या आशांवर पाणी! ऑलिंपिक पदकाच्या शर्यतीतून भारतीय नौकानयन जोडी बाहेर