भारतीय महिला वेगवान गोलंदाज मानसी जोशी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे आता तिला महिला टी२० चॅलेंज अर्थात महिला आयपीएलमध्ये सहाभागी होण्यासाठी मुंबईला जाता आलेले नाही.
२७ वर्षीय मानसी महिला आयपीएलमध्ये मिताली राज कर्णधार असलेल्या वेलोसिटी संघाचा भाग आहे. पण इएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार तिच्याऐवजी २६ वर्षीय मेघना सिंगचा वेलोसिटी संघात समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच मानसीला आता या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. असे असले तरी अजून याबाबतीत अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही.
तसेच मानसी डेहराडूनमध्ये सध्या क्वारंटाईन असून ती १० ऑक्टोबरला कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळली होती.
महिला आयपीएल यंदा युएईमध्ये ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. ४,५ आणि ७ नोव्हेंबरला साखळी फेरीचे सामने होतील. तर ९ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. असे असले तरी अजून हे सामने कोणत्या मैदानावर खेळवले जाणार आहेत, याबद्दल बीसीसीआयने माहिती दिलेली नाही. या स्पर्धेतील सर्व सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे.
तसेच या स्पर्धेत सुपरनोवाज, ट्रेलब्लेझर्स आणि वेलोसिटी असे तीन संघ सहभागी होणार असून त्यांचे नेतृत्व अनुक्रमे हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधना आणि मिताली राज करणार आहेत. या स्पर्धेसाठी तीन्ही संघात निवड झालेल्या भारतीय खेळाडूंना मुंबईत ९ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. त्यानंतर या खेळाडू मुंबईतून युएईला रवाना होतील. तिथेही त्यांना ६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
-महिला आयपीएल: बीसीसीआयने घोषित केले वेळापत्रक आणि संघ; पाहा कोणाला मिळाली कर्णधारपदी संधी
-महिला आयपीएलचे सामने होणार युएईमधील ‘या’ शहरात?
-महिला आयपीएल: ‘या’ दिवशी खेळाडू पोहोचणार मुंबईला, पुर्व तयारीवर प्रश्नचिन्ह
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष
यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे
आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण