यंदाच्या विश्वचषकात अद्याप कोणत्याही संघाकडून मोठी धावसंख्या दिसली नसली तरी अनेक छोट्या संघांनी मोठ्या संघांना नक्कीच पराभूत केले आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या स्पर्धेत आतापर्यंत अनेक फेर-बदल पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले आहेत. मात्र, पुढील फेरीत केवळ आठ संघ प्रवेश करतील. आतापर्यंत अफगाणिस्तान आणि भारतासह चार संघ सुपर-8 साठी पात्र ठरले आहेत.
टी20 विश्वचषक 2024 च्या आवृत्तीत 20 संघांना चार गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातून फक्त दोनच संघ स्पर्धेच्या पुढील टप्प्यात प्रवेश करतील. भारतीय संघाने 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेत अ गटातून सुपर-8 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. अमेरिका किंवा पाकिस्तान या गटातून दुसरा संघ असू शकतो. यूएसएला सुपर-8 मध्ये पोहोचण्यासाठी फक्त आपला सामना जिंकावा लागेल, तर पाकिस्तानला पात्र होण्यासाठी आपला सामना जिंकावा लागेल आणि आयर्लंडविरुद्ध यूएसएच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. मात्र, या गटातून अद्याप कोणताही संघ बाहेर पडलेला नाही.
ऑस्ट्रेलियाने ‘ब’ गटातून सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आपले सर्व सामने जिंकले आहेत. या गटातील दुसरा संघ स्कॉटलंड किंवा इंग्लंड असू शकतो. येथे देखील प्रकरण मागील अ गटाप्रमाणेच समीकरण आहे. नामिबिया आणि ओमान या गटातून बाहेर पडले आहेत.
तर ‘क’ गटातून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज सुपर-8 साठी पात्र ठरले आहेत. तर युगांडा, पापुआ न्यू गिनी आणि न्यूझीलंड स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. न्यूझीलंड पहिल्यांदाच टी20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतून बाहेर पडला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ ‘ड’ गटातून सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. तर बांग्लादेश हा या गटातून पुढील फेरीत जाणारा दुसरा संघ ठरु शकतो. तथापि, नेदरलँड्स देखील अद्याप शर्यतीत आहे, परंतु त्याचा नेट रन रेट खूपच खराब आहे. बांग्लादेशला शेवटचा साखळी सामना नेपाळविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकताच बांग्लादेश सुपर-8 मध्ये प्रवेश करेल.
महत्तवाच्या बातम्या-
अशी आहेत पाकिस्तानसाठी ‘क्वालिफाय’ समीकरणे, पाहा कोणत्या संघाचा होणार पत्ता कट
कॅनडाविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे सरावसत्र रद्द! जाणून घ्या कारण
कोण वीरेंद्र सेहवाग…? शाकिब अल हसनचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल