आगामी जून महिन्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. १८ ते २२ जून साऊदम्प्टनच्या एजेस बाऊल मैदानावर हा सामना खेळवला जाईल. या स्पर्धेच्या विविध फेऱ्यांमधून अव्वल दोन स्थान पटकावत या अंतिम सामन्यात पोहोचलेले भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने असतील. या सामन्याआधी न्यूझीलंडच्याच माजी खेळाडूने या आव्हानाबाबत न्यूझीलंडला सावध केले आहे.
“हे तुमच्याच बॉसविरुद्ध गोल्फ खेळण्यासारखे आहे”
मार्क रिचर्डसन या न्यूझीलंडच्याच माजी खेळाडूने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी किवी संघाला सावध केले आहे. भारताविरुद्ध खेळणे म्हणजे आपल्याच बॉस विरुद्ध गोल्फ खेळण्यासारखे आहे, असे विधान रिचर्डसनने केले आहे. रिचर्डसन म्हणाला, “मला हे पाहायला आवडेल की व्यक्तिगत रित्या तुम्हाला कोणाविरुद्ध खेळायला आवडते आहे. जर मी आत्ता भारताकडे पाहिले तर ते आपल्याच बॉस विरुद्ध गोल्फ खेळण्यासारखे आहे. तुम्हाला जिंकण्याची परवानगी आहे, मात्र अचूक पद्धतीनेच. आम्ही यापूर्वी त्यांना न्यूझीलंडमध्ये एक दोन वेळा हरवले आहे. पण आम्हला असे वाटलेच नाही की आम्ही त्यांना पराभूत केले.”
रिचर्डसनने यावेळी जागतिक क्रिकेटमधील तीन महासत्ता असलेले देश – भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, यांच्याबद्दल पण आपली मत व्यक्त केली. त्याचप्रमाणे न्यूझीलंडच्या संघासाठी या तीनही देशांविरुद्ध खेळणे कशा विविध प्रकारे आव्हानात्मक आहे, याबाबत देखील चर्चा केली.
रिचर्डसन म्हणाला, “इंग्लंडबाबत बोलायचे झाल्यास त्यांनीच हा खेळ जन्माला घातला. आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्याविरुद्ध खेळतांना नेहमीच तुमचे अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करत असतात. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणे म्हणजे न्यूझीलंडचे अस्तित्व ठळक करण्यासाठीचा प्रयत्न असायचा. आम्ही त्यांच्या विरुद्ध जे खेळलो, त्याचा मला अतिशय अभिमान आहे. कारण अनेकदा भलेभले दिग्गज त्यांच्यासमोर अपयशी ठरल्याचे आम्ही पाहिले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
विस्डेनने निवडला सर्वकालीन भारतीय कसोटी संघ; सेहवाग-धोनीला डच्चू, तर ‘हा’ खेळाडू असेल कर्णधार
स्पर्धा स्थगितीचा सिलसिला सुरुच! कोरोनामुळे आयपीएलनंतर ‘ही’ मोठी टी२० लीग ढकलली पुढे
मोठी बातमी! दोन वेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला सागर धनखड हत्येप्रकरणी अखेर अटक






