---Advertisement---

पहावं ते नवलंच! मार्नस लॅब्यूशानेने बॅटची ग्रीप बसवताना केले असे काही की तुम्हालाही येईल हसू, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, जानेवारी 7, 2021 6:27 PM
---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी (७ जानेवारी) मार्नस लॅब्यूशानेने नाबाद ६७ धावांची खेळी केली आहे. या दरम्यान त्याचा एक गमतीशीर व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.

झाले असे की पहिल्या दिवशी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला लॅब्यूशाने त्याचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर डावाच्या ४५ व्या षटकादरम्यान त्याच्या बॅटची ग्रीप नीट बसवत होता. त्याने ती ग्रीप बसवल्यानंतर बॅटच्या हँडेलवर तो फुंकर मारत असल्यासारखा दिसला. त्यामुळे हा प्रकार अनेकांना गमतीशीर वाटला.

त्याचा असे अजबप्रकारे बॅटची ग्रीप बसवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी म्हटले आहे की त्याला त्याची बॅट फारच प्रिय आहे. तसेच काहींनी तो नक्की काय करत आहे? असा प्रश्न विचारला आहे.

https://twitter.com/pattykelleher4/status/1347098505718898689

सिडनी कसोटीत पहिल्या दिवशी लॅब्यूशानेने पदार्पण करणाऱ्या विल पुकोस्कीसह १०० धावांची भागीदारी केली. त्यानंतर पुकोस्की बाद झाल्यावर त्याने स्मिथबरोबर पहिल्या दिवसाखेरपर्यंत नाबाद ६० धावांची भागीदारी केली. स्मिथने पहिल्या दिवसाखेर नाबाद ३१ धावा केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दिवसाखेर ५५ षटकात २ बाद १६६ धावा झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

वॉर्नरच्या बाद होण्याच्या पद्धतीवर माजी खेळाडूंनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह, म्हणाले…

जगातील सर्वाधिक वयोवृद्ध क्रिकेटपटूचे निधन! आता महाराष्ट्रात जन्मलेला ‘हा’ खेळाडू ठरतोय वयोवृद्ध क्रिकेटपटू

ज्या नवदीप सैनीने सिडनीत कसोटी पदार्पण केले, त्याच्यासाठी एकवेळ भांडला होता गंभीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---