आॅकलँड | आज न्युझीलँड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० सामन्यात न्युझीलँडने मार्टीन गप्टीलच्या शतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद २४३ धावा केल्या अाहेत.
या सामन्यात मार्टीन गप्टीलने एक खास विक्रम केला.यापुढे टी२० सामन्यात कारकिर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.
त्याने टी२० क्रिकेटमध्ये ७३ सामन्यात २१८८ धावा केल्या आहेत. यापुर्वी हा विक्रम ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नावावर होता. त्याने ७१ सामन्यात २१४० धावा केल्या अाहेत.
या यादीत तिसऱ्या स्थानी भारताचा विराट कोहली असुन त्याने ५५ सामन्यात १९५६ धावा केल्या आहेत.
मार्टीन गप्टीलचा हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बरोबरीचा असण्याची कारणे म्हणजे कसोटी आणि वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सचिनच्या नावावर असुन आता टी२० मधील विक्रम अाता गप्टीलच्या नावावर झाला अाहे.
टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
२१८८ धावा- मार्टीन गप्टील
२१४० धावा- ब्रेंडन मॅक्क्युलम
१९५६ धावा- विराट कोहली