कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांच्या मदतीसाठी बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफे मोर्तझाने आपल्या आठवणीतील सर्वात जवळ असणाऱ्या ब्रेसलेटचा लिलाव केला आहे. जवळपास १८ वर्षांपासून हे ब्रेसलेट त्याच्याकडे होते.
आयपीडीसी फायनान्सने (IPDC Finance) ४२ लाख टका म्हणजेच ३७ लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीमध्ये मोर्तझाचे हे ब्रेसलेट विकत घेतले आहे. असे असले तरी त्याला त्याचे ब्रेसलेट (Bracelet) पुन्हा मिळणार आहे.
आयपीडीसी फायनान्सचे व्यवस्थापन संचालक मोमिनुल इस्लाम (Mominul Islam) यांनी म्हटले की, “ते स्टीलपासून बनलेले ते ब्रेसलेट मोर्तझाला भेटवस्तू म्हणून देणार आहेत.”
फेसबूक लाईव्हवर लिलाव संपल्यानंतर मोर्तझाने (Mashrafe Mortaza) ते ब्रेसलेट हातातून काढले होते. त्यावेळी तो खूप भावूक झाला होता.
यापूर्वी मोर्तझाने बांगलादेश क्रिकेटकडून मिळणारा आपला अर्धा पगारही मदत म्हणून दिला होता.
मोर्तझाने बांगलादेशकडून (Bangladesh) आतापर्यंत ३६ कसोटी सामने, २२० वनडे सामने आणि ५४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ७८, वनडेत २७० आणि ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पाकिस्तानच्या दोन मोठ्या खेळाडूंनी सोडला टीमचा वाॅट्सअप ग्रुप
-हा फलंदाज खेळला नसता तर टीम इंडियाने कदाचीत कधीच केली नसती फटकेबाजी
-कसोटी क्रिकेटमध्ये कधीही अव्वल स्थानी न आलेले महान खेळाडू