मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज क्रिकेट खेळणाऱ्या अनेक युवा खेळाडूंचा आदर्श आहे. पण खुद्द सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील आदर्श भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विव रिचर्ड्स हे होते. तर त्याचे वडील रमेश तेंडुलकर हेच त्याचे वास्तविक जीवनातील नायक होते, असे स्वत: सचिनने सांगितले आहे.
देशात साथीच्या कोराना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर १००० मुलांची मोफत शस्त्रक्रिया केल्यानंतर श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्यूएल ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ सोहळ्याच्या वेळी सचिन बोलत होता.
सचिनने म्हटले आहे की ‘मी जेव्हा क्रिकेट खेळायचो, मी जेव्हा युवा होतो, तेव्हा मला क्रिकेटपटू बनून आपल्या देशाला पुढे न्यायचे होते. माझे दोन आदर्श होते. एक सुनील गावसकर, जे भारतासाठी अनेक वर्षे खेळले आणि त्यांनी शानदार कामगिरी केली. ते माझे फलंदाजीमधील आदर्श होते.’
तसेच सचिन म्हणाला, ‘त्यांच्याबरोबरच वेस्ट इंडिजचे विव रिचर्ड्स हे पण आदर्श होते. जेव्हा मी क्रिकेट खेळायचो, तेव्हा माझ्यासाठी हे माझे फलंदाजीतील आदर्श होते. पण माझ्या आयुष्याचे खरे आदर्श माझे वडील होते. मी त्यांच्याबरोबर इतका वेळ घालवला. ते खूप सौम्य आणि शांत होते. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. त्यामुळे माझे स्वप्न होते की मी त्यांच्यासारखे बनावे. मी म्हणेल की माझे वडील माझे खरे हीरो होते.’
यावेळी सचिनने रुग्णालयाने केलेल्या कामाचेही कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला आयपीएल: ‘या’ दिवशी खेळाडू पोहोचणार मुंबईला, पुर्व तयारीवर प्रश्नचिन्ह
चेतेश्वर पुजाराच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला १० वर्षे पूर्ण, चाहत्यांचे मानले ‘असे’ आभार
“१० कोटी नाही तर त्याची किंमत…”, माजी भारतीय क्रिकेटरने साधला मॅक्सवेलवर निशाना
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात स्मिथ, अय्यरसह ‘हे’ ५ खेळाडू करु शकतात खास विक्रम
हैदराबादने एकहाती जिंकला सामना; जाणून घ्या पंजाबच्या पराभवाची ५ कारणे
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला