आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज माथिशा पाथिराना यानं महेंद्रसिंह धोनीची खूप प्रशंसा केली आहे. त्यानं धोनीला आपल्या वडिलांसारखं म्हटलंय.
माथिशा पाथिराना २०२२ पासून सीएसकेसोबत आहे. २१ वर्षीया पाथिरानाला बेबी मलिंगा म्हटलं जातं कारण त्याची गोलंदाजीची शैली श्रीलंकेचा महान गोंलदाज लसिथ मलिंगा याच्याशी मिळतीजुळती आहे. धोनीनं एक व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर पाथिरानाची कला ओळखली आणि त्याला चेन्नईमध्ये शामिल करण्याचा निर्णय घेतला. पाथिरानानं जून २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो श्रीलंकेकडून आतापर्यंत १२ एकदिवसीय आणि १२ टी२० सामने खेळला आहे.
सीएसकेच्या वेबसाईटनुसार पाथिराना म्हणाला, “माझ्या वडिलांनंतर माझ्या क्रिकेट कारकिर्दीत धोनीच माझ्या पित्याची भूमिका निभावत आहेत. ते नेहमी माझी काळजी घेतात आणि सातत्यानं काय करावं याचा सल्ला देतात. जेव्हा मी घरी असतो तेव्हा माझे वडील माझ्यासाठी असं करतात.”
पाथिरानानं धोनी द्वारे मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल बोलताना सांगितलं की, “जेव्हा मी मैदान किंवा मैदानाबाहेर असतो तेव्हा ते मला खूप साऱ्या गोष्टी सांगत नाहीत. ते फक्त छोट्या-छोट्या गोष्टी सांगतात, मात्र त्यामुळे खूप फरक पडतो आणि मला विश्वासही मिळतो. या छोट्या-छोट्या गोष्टी खूप उपयोगी आहेत.”
पाथिरानानं या आधीही धोनीची अनेक वेळा प्रशंसा केली आहे. त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी धोनीकडून खूप काही शिकलो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, धोनी विनम्र आहे, आणि त्यामुळेच तो खूप जास्त यशस्वी आहे. पाथिराना पुढे म्हणाला की, “जेव्हा मी आयपीएलमध्ये आलो, तेव्हा मी एक छोटा मुलगा होतो. मला कोणीच ओळखत नव्हतं. त्यांनी मला ट्रेन केलं आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्या. आता मला माहित आहे की, मला टी२० मध्ये कसं परफॉर्म करायचं आहे आणि सामन्यात माझे ४ ओव्हार कसे बॅलन्स करायचे आहेत. धोनीनं मला सांगितलं आहे की, जर मी दुखापतीपासून दूर राहिलो, तर मी देशासाठी खूप काही करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
भुवनेश्वर कुमारनं राजस्थानच्या जबड्यातून हिसकावला सामना, हैदराबादचा शेवटच्या चेंडूवर विजय
टी20 विश्वचषकाचं काउंटडाउन सुरू, आयसीसीनं रिलिज केलं स्पर्धेचं अधिकृत गाणं