क्रिकेटचा सर्वात नवा प्रकार असलेला ‘द हंड्रेड’ ची पहिलीवहिली लीग सध्या इंग्लंडमध्ये खेळली जात आहे. प्रत्येकी १०० चेंडूंच्या या सामन्याला चाहत्यांची व समीक्षकांची दाद मिळतेय. या स्पर्धेमध्ये रोज नवनव्या गोष्टी घडत आहेत. अनेक खेळाडू आपल्या वैयक्तिक कामगिरीने लक्ष वेधून घेतायेत. इंग्लंडचा लेगस्पिनर मॅट पार्कीसन याने २५ जुलै रोजी झालेल्या सामन्यात एक थक्क करणारा चेंडू टाकला. या चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पार्किसनची थक्क करणारी फिरकी
मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर मॅंचेस्टर ओरिजनल्स विरुद्ध बर्मिंघम फिनिक्स असा सामना खेळला गेला. मॅंचेस्टर संघाकडून खेळताना मॅट पार्कीसनने जबरदस्त गोलंदाजी करत बर्मिंघम संघाला रोखण्याचे काम केले. त्याच्या फिरकीची एकाही फलंदाजाकडे तोड नव्हती. त्याने १९ चेंडू टाकताना केवळ ९ धावा देऊन ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
बर्मिंघम संघाच्या डावातील ८१ वा चेंडू टाकताना पार्कीसनने ख्रिस कूक याला फसवले. त्याने चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला. कूक तो चेंडू लेग साईडला मारण्याच्या प्रयत्न होता. मात्र, चेंडू जमिनीवर पडताच तब्बल ११ अंशांची फिरकी घेत ऑफ स्टंपवर जाऊन आदळला. या चेंडूनंतर कूकसहीत सर्वजण अवाक् झाले. पार्कीसनने यावर्षीच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये देखील अशाच प्रकारचा एक चेंडू टाकला होता. ज्याची तुलना शेन वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ शी केली गेलेली.
https://www.youtube.com/watch?v=mTpygkqKWHs
मॅंचेस्टरचा सोपा विजय
त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बर्मिंघम फिनिक्स संघ पूर्ण १०० चेंडू देखील खेळू शकला नाही. मॅट पार्कीसनच्या फिरकी पुढे त्यांचा डाव ८४ चेंडूत ८७ धावा करून संपुष्टात आला. प्रत्युत्तरात, मॅंचेस्टरसाठी कर्णधार जोस बटलर व सलामीवीर फिल सॉल्ट यांनी अनुक्रमे ३० व २२ धावा करून विजयाची पायाभरणी केली. संघाने ७३ चेंडूत विजयी लक्ष पार केले. सामनावीर म्हणून पार्कीसनची निवड करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या –
एकदम झक्कास! स्विमिंगमध्ये साजन प्रकाशने पटकावला दुसरा क्रमांक, ठरला दुसराच भारतीय
हार्दिकच्या बॅटनेच केला भारताचा घात! श्रीलंकेच्या फलंदाजाने ‘तो’ खणखणीत षटकार खेचत वळवला सामना