---Advertisement---

आयसीसी स्पर्धांमध्ये भारताविरूद्ध चमकदार कामगिरी करणारे 3 गोलंदाज

On: रविवार, मार्च 2, 2025 8:19 PM
---Advertisement---

यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जात आहे. या मेगा स्पर्धेच्या 12व्या सामन्यात आज (2 मार्च) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ आमने-सामने आहेत. दोन्ही संघातील हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 250 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारतीय संघाच्या डावादरम्यान, मॅट हेन्री (Matt Henry) त्याच्या धोकादायक गोलंदाजीमुळे खूप चर्चेत होता. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या 5 फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

या कामगिरीसह, मॅट हेन्री आयसीसी वनडे स्पर्धेत भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण आयसीसी वनडे स्पर्धांमध्ये भारताविरुद्ध धारदार गोलंदाजीने वर्चस्व गाजवणाऱ्या 3 गोलंदाजांबद्दल जाणून घेऊया.

1) केन मैकाले- 6/39 (विश्वचषक 1983)- 1983 मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वविजेता बनला. या मेगा स्पर्धेदरम्यान, कपिल देवच्या (Kapil Dev) संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा 11वा सामना खेळला, ज्यामध्ये संघाला 162 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. भारताच्या पराभवामागे सर्वात मोठा हात केन मैकालेचा होता, ज्याने 11.5 षटकांत 39 धावा देत 6 विकेट्स घेतल्या.

2) डेमियन फ्लेमिंग- 5/36 (विश्वचषक 1996)- 1996च्या वनडे विश्वचषकातील 19वा सामना भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 16 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा नायक डेमियन फ्लेमिंग होता, ज्याने त्याच्या 9 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 36 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

3) मॅट हेन्री – 5/42 (चॅम्पियन्स ट्रॉफी 2025)- 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध पहिला सामना खेळण्यासाठी उतरला आहे, ज्यामध्ये भारताचे अनेक मोठे फलंदाज मोठे अपयशी ठरले. यामध्ये शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल सारख्या फलंदाजांची नावे होती. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने शानदार कामगिरी केली आणि 8 षटकांत 42 धावा देत 5 फलंदाजांना (गिल, कोहली, जडेजा, पांड्या आणि शमी) यांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीचा महान विश्वविक्रम! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
“कोहलीपेक्षा बाबर श्रेष्ठ? पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकांची वादग्रस्त टिप्पणी!”
“विराट कोहलीचा नवा विक्रम, न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी करून सचिन-धोनीच्या खास यादीत समावेश”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---