मुंबई । इंग्लंडचा लेगस्पिनर मॅट पार्किन्सन प्रशिक्षणादरम्यान जखमी झाला आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे तो आयर्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.
फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्या या 23 वर्षीय गोलंदाजाला सोमवारी क्षेत्ररक्षण सराव दरम्यान दुखापत झाली.
साऊथॅम्प्टनच्या एजिअस बाऊलमध्ये जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात होणार्या इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना 30 जुलै रोजी खेळला जाणार आहे.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “घोट्याच्या दुखापतीमुळे आयर्लंडसोबत होणार्या वनडे मालिकेमधून मॅट पार्किन्सन हा बाहेर पडला आहे.”
इंग्लंडने अद्याप पार्किन्सनचा पर्यायी म्हणून खेळाडूंचे नाव जाहीर केले नाही. आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी ईसीबीने जाहीर केले की, फिरकीपटू मोईन अली संघाचा उपकर्णधार असेल. ओयन मॉर्गन कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारेल.
इंग्लंड संभाव्य खेळाडूंचे दोन संघ तयार करून आपसात दोन सामने आणि आयर्लंडविरुद्धही सराव सामना खेळणार आहे. त्या सामन्यानंतर या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करेल.
ट्रेंडिंग घडामोडी –
आम्ही गांगुलीचं ऐकणार नाही, भारताला आम्ही सांगू ते करावंच लागेल
या क्रिकेटपटूने दारुच्या नशेत केला कार अपघात; झाली मोठी शिक्षा
ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यातून बेन स्टोक्स बाहेर? जाणून घ्या काय आहे कारण






