न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीच्या शतकावर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की विराट कोहलीने नक्कीच शतक केले पण डॅरिल मिचेल आणि श्रेयस अय्यरने त्याच्यापेक्षा चांगली खेळी खेळली. हेडनच्या मते, डॅरिल मिचेल आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकांचे महत्त्व खूप जास्त होते.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने जबरदस्त खेळी केली. विराट कोहलीने 113 चेंडूत 117 धावा करत जबरदस्त शतक झळकावले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 50 वे शतक आहे आणि आता तो एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. विराट कोहलीने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला आहे. याशिवाय श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) यांनीही शतकी खेळी खेळली. मात्र, या दोन्ही फलंदाजांनी अतिशय वेगाने शतके झळकावली.
मॅथ्यू हेडनच्या मते, अय्यर आणि मिचेल यांनी त्यांच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या खेळी खेळल्या. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना तो म्हणाला, “दोन्ही संघांवर नजर टाकली तर कदाचित विराट कोहलीच्या शतकाला सर्वात कमी महत्त्व होते. तुमचा विश्वास आहे का? त्याने एवढा मोठा विक्रम केला पण श्रेयस अय्यर आणि डॅरिल मिशेल ज्या प्रकारे खेळले, त्यांची खेळी खूपच जबरदस्त होती.”
विराट कोहलीने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. गोलंदाजीत मोहम्मद शमीने भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करत 7 विकेट्स घेतल्या. त्याच्या या चमकदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गैरविण्यात आले. (Matthew Hayden striking reaction He said the century of these two is more important than the century of Virat)
म्हत्वाच्या बातम्या
टीम इंडियाला मिळणार नवे कोच? वर्ल्डकप जिंकला तरी होणार द्रविड यांचे पॅकअप?
World Cup 2023 Semi Final: रिटायर्ड हर्ट होण्याच्या निर्णयाविषयी गिलकडून मोठा खुलासा, म्हणाला, ‘मला आधी…’