---Advertisement---

ग्लेन मॅक्सवेलबद्दल विराट कोहलीने केले मोठे भाष्य; म्हणाला…

On: गुरूवार, नोव्हेंबर 14, 2019 5:41 PM
---Advertisement---

गुरुवारपासून (14 नोव्हेंबर) होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर (Holkar Cricket Stadium, Indore) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.

या सामन्यापूर्वी बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाचा (Australia) अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) प्रशंसा केली आहे.

मॅक्सवेलने काही दिवसांपूर्वी  मानसिक आजाराचा त्रास होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काही काळासाठी विश्रांती घेतली आहे.

“आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना संघातील प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका मांडता आली पाहिजे. मला वाटते की मॅक्सवेलने चांगली कामगिरी केली आहे,” असे सामन्यापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला.

“मॅक्सवेलने जगातील क्रिकेटपटूंसमोर एक आदर्श ठेवला आहे. जर तुम्ही मानसिकरित्या ठीक नसता तेव्हा तुमच्यासमोर विश्रांती घेण्याची खूप वेळा संधी येत असते,” असे विराट म्हणाला.

भारतीय संघ 2014ला इंग्लंड (England) दौऱ्यावर असताना विराट खराब फॉर्मशी झगडत होता. याबद्दलचीही आठवण विराटने करुन दिली आहे.

“मी माझ्या कारकीर्दीतील अश्या प्रसंगामधून गेलो आहे, ज्यामुळे मला असे वाटले की संपूर्ण जग नष्ट झाले. मला काय करावे, सर्वांना काय सांगू, त्यांच्याशी कसे बोलू, हे समजत नव्हते.” असे विराट म्हणाला.

“खरं सांगायचं झालं तर पत्रकारांचे एक काम आहे आणि त्याचबरोबर आमचेही काम आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या कामावर लक्ष देत असतो. दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे माहिती करून घेणे कठीण असते.” असे पुढे भारतीय कर्णधार विराट म्हणाला.

जर एखाद्या खेळाडूकडे संघर्ष करण्यासाठी मानसिक क्षमता नसेल तर त्याला याच्याशी संघर्ष करण्यासाठी त्याला प्रोत्साहित केले पाहिजे.

“मी त्यावेळी मानसिकदृष्ट्या व्यवस्थित नव्हतो आणि खेळापासून विश्रांती घेण्याची गरज होती, हे मी कोणालाही सांगू शकलो नाही. कारण यावर काय प्रतिक्रिया येईल याबद्दल कल्पना नव्हती,” असे विराट 2014 च्या इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीची आठवण सांगताना म्हणाला.

“मला वाटते की अशा गोष्टींचा सन्मान केला पाहिजे आणि याला नकारात्मक पद्धतीने नाही घेतले पाहिजे. ही एखाद्याच्या आयुष्यात होत असलेल्या घटनेचा सामना करण्याची क्षमता नसण्याची गोष्ट आहे. या गोष्टींकडे सकारात्मकदृष्टीने पाहिले पाहिजे,” असेही विराट म्हणाला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---