भारतीय अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर वनडे सामने खेळत आहे. भारतीय संघाने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
भारताच्या या कामगिरीत सलामीवीर मयंक आग्रवालचा मोठा वाटा आहे. त्याने या दौऱ्यात आत्तापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात शतके ठोकली आहेत.
त्याने आज 26 जूनला चालू असलेल्या इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध या दौऱ्यातील तिसरे शतक केले आहे. या सामन्यात त्याने शुभमन गिलबरोबर सलामीला येत 104 चेंडूत 112 धावा केल्या. यात त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच गिलबरोबर 165 धावांची सलामी भागिदारी रचली.
त्याच्याबरोबरच या सामन्यात गिलने 72 धावा तर हनुमा विहारीने 69 धावा केल्या आहेत. त्यांच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 309 धावा केल्या आहेत.
याआधीही मयंकने तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 25 जूनला विंडीज विरुद्धही शतक केले होते. या सामन्यातही त्याने 102 चेंडूत 112 धावा केल्या होत्या.
तसेच 19 जूनला खेळलेल्या लिसेस्टरसर विरुद्धच्या सामन्यात त्याने तुफानी खेळी करताना 106 चेंडूतच 18 चौकार आणि 5 षटकारांसह 151 धावा केल्या होत्या. या सामन्यात तो रिटायर्ड हार्ट झाला होता.
याबरोबरच मयंक भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका मोसमात 2000 धावा पुर्ण करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने यावर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये 8 सामन्यात 3 शतके आणि 4 अर्धशतके केली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–जगात अनेक क्रिकेटर झाले परंतु असा पराक्रम करणारा धोनी एकटाच!
–बापरे! ५०० वर्ष जून्या शाळेच्या मैदानावर किंग कोहलीने केला सराव
–टीम इंडिया उद्या खेळणार ऐतिहासिक शंभरावा टी२० सामना