14 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात सुरु झालेला पहिला कसोटी सामना (First Test Match) शनिवारी (16 नोव्हेंबर) तिसऱ्या दिवशी संपला. या सामन्यात भारतीय संघ एक डाव आणि 130 धावांनी (Won By An Inning & 130 Runs) जिंकला.
या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने (Mayank Agarwal) द्विशतकी खेळी करताना 243 धावा केल्या. त्यात 8 षटकार आणि 28 चौकारांचा समावेश होता.
त्याने ही द्विशतकी खेळी केल्या नंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीशी बोलताना अनेक गोष्टींचा खूलासा केला आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे.
Captain @imVkohli interviews Man of the Moment @mayankcricket 🙌🙌
Hitting his 2nd double hundred, keeping the fitness level high & being the team man, Mayank discusses it all with the captain – by @28anand
Full interview🗣️https://t.co/aDNFRzU4Pw pic.twitter.com/MFytjqqxH7
— BCCI (@BCCI) November 15, 2019
“मानसिकतेबद्दल बोलताना मी एवढेच सांगेल की, माझ्या मनातील अपयशाची भीती मी दूर केली आहे. त्यामुळे माझ्यात खूप बदल झाले आहेत. मनातील भीती दूर केल्यानंतर माझी धावांची भूक वाढली.’
‘अशीही एक वेळ होती जेव्हा मी धावा करू शकलो नाही. पण आता मी जेव्हा जेव्हा सेट होतो तेव्हा मी मोठ्या धावा काढण्याचा प्रयत्न करतो,” असे मयंक मानसिकतेबद्दल बोलताना म्हणाला.
“मी माझ्या प्रवासाचा नक्कीच आनंद घेतला आहे. माझा पहिला सामना मेलबर्नमध्ये खेळणे खूप खास होते. मी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) प्रथमच भारताने मालिका जिंकली, यामुळे मला खूप आनंद झाला,” असेही ऑस्ट्रेलिया विरुद्ध मागीलवर्षी पदार्पण करणारा मयंक पुढे म्हणाला.
“या भावनेनेच मला व संघाला पुढे जाऊन स्पर्धा जिंकण्याची प्रेरणा दिली. मी एका वेळी एकच चेंडू खेळण्याचा आणि शक्य तेवढी जास्तवेळ फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो,” असेही मयंकने सांगितले.
गेल्या महिन्यात विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) कसोटी सामन्यात मयंक अग्रवालने 215 धावा केल्या होत्या. हे त्याच्या कारकिर्दीतील पहिले दुहेरी शतक होते. या सामन्यात अग्रवालने 371 चेंडूंचा सामना करत 23 चौकार आणि 6 षटकार मारत 215 धावा केल्या होत्या.
कॅप्टन कोहलीने मयंक अगरवालकडे केली ही मागणी, मात्र यामुळे झाली नाही ती पूर्ण!
वाचा- https://t.co/7SePDLXnFA#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #ViratKohli #MayankAgarwal— Maha Sports (@Maha_Sports) November 17, 2019
…म्हणून मयंक अगरवालला संघसहकारी म्हणायचे 'गजनी'
वाचा- 👉https://t.co/wD7uggynGl👈#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 17, 2019