---Advertisement---

टीम इंडियाची ‘माफीया गँग’! मयंक अगरवालने शेअर केलेला ‘हा’ फोटो होतोय व्हायरल

On: रविवार, फेब्रुवारी 28, 2021 11:40 PM
---Advertisement---

सध्या भारत आणि इंग्लंड संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यानंतर २-१ अशा फरकाने भारतीय संघ आघाडीवर आहे. आता चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ४ मार्चपासून सुरु होणार आहे. हा सामना सुरु होण्याआधी भारतीय संघाला बराच मोकळा वेळ मिळाला. कारण अहमदाबादलाच पार पडलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने केवळ २ दिवसात विजय मिळवला होता. त्यामुळे मिळालेल्या अधिकच्या मोकळ्या वेळात भारतीय खेळाडू एकत्र मजामस्ती करत आहेत.

या दरम्यान भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या मयंक अगरवालने इंस्टाग्रामवर भारतीय खेळाडू आणि फलंदाजी प्रशिक्षक चर्चा करत असल्याचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने ‘माफिया गॅंग’ असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टमध्ये कर्णधार विराट कोहली, आर अश्विन, केएल राहुल, हार्दिक पंड्या सर्व प्रशिक्षक चर्चा करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CLzRAZRFnvD/

मयंक अगरवालला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत संधी मिळाली होती, पण त्याला संधीचे सोने करता आले नाही. भारतीय संघात सलामीसाठी शुबमन गिल आणि रोहित शर्मा हे चांगली कामगिरी करत आहेत. तर मध्यक्रमात विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत फलंदाजीसाठी येतात. त्यामुळे सध्या मयंक अगरवालला संघात स्थान मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

मयंक अगरवालची कामगिरी

मयंक अगरवालने भारतीय संघाच्या अनेक विजयांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत एकूण १४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४५.७ च्या सरासरीने १०५२ धावा केल्या आहेत. यात त्याने ३ शतकं आणि ४ अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच त्याने भारतीय संघासाठी ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने १७.२ च्या ८६ धावा केल्या आहेत.

भारत कसोटी मालिकेत पुढे 

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ २- १ पुढे आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार जो रूटच्या दुहेरी शतकाच्या जोरावर इंग्लंड संघाने २२७ धावांनी विजय मिळवला होता. त्यांनतर भारतीय संघाने चोख प्रत्युत्तर देत दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला ३१७ धावांनी पराभूत करत मालिका १-१ ने बरोबरीत आणली होती. तसेच अहमदाबादमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या फिरकी जोडीने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भुमिका बजावली होती. तिसरा कसोटी सामना भारतीय संघ १० गडी राखून जिंकत मालिकेत २-१ ने पुढे आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘असा’ घालवला लॉकडाऊनचा काळ, पिझ्झा, बर्गरवर मारला ताव, केएल राहुलने केला खुलासा

आरसीबीसाठी आनंदाची गोष्ट! ‘या’ खेळाडूने ठोकलंय सलग तिसरं शतक, ५ सामन्यात ५०० पेक्षा अधिक धावा

भारताविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---