इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम जस-जसा प्ले ऑफच्या दिशेने जात आहे, तस-तशी सामन्यांची रोमांचकता वाढत आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झालेला सामना तर खूपच खास होता. या सामन्यात पंजाबने दूसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईच्या जबड्यातून विजय खेचला. मात्र या ऐतिहासिक सामन्याचा नायक ठरला केवळ एकच खेळाडू, तो म्हणजे पंजाबचा शिलेदार ‘मयंक अगरवाल’.
दुबईच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात मयंकने सुपर ओव्हरमध्ये शानदार फलंदाजीबरोबर उल्लेखनीय क्षेत्ररक्षणही केले. पहिल्या सुपर ओव्हरमधील जबरदस्त चुरसीनंतर सामन्याचा अंतिम निकाल लावण्यासाठी दूसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. दरम्यान दूसऱ्या सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मुंबईचा धाकड फलंदाज कायरन पोलार्डने डीप विकेटकडे जोरदार शॉट मारला. त्या चेंडूला पाहून हा नक्कीच षटकार जाईल, असे वाटत होते.
पण डीप विकेटकडे क्षेत्ररक्षणासाठी उभारलेल्या मयंकने हवेत मोठी उडी घेत चेंडूला सीमारेषेच्या आत फेकले. त्यानंतर जवळच उभा असलेल्या अर्शदिप सिंगने धावत येत चेंडू खेळपट्टीकडे फेकला. त्यामुळे मुंबईचे फलंदाज त्या चेंडूवर फक्त २ धावा घेऊ शकले.
मयंकच्या या दिमाखदार क्षेत्ररक्षणामुळे पंजाबने धावा वाचवल्या. पुढे दूसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईच्या धावांचा पाठलाग करताना मयंकने २ चौकार लगावले आणि पंजाबचा तिसरा विजय साकारला.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित, रैना, विराटलाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते केएल राहुलने करुन दाखवले
सुपर ओव्हर पे सुपर ओव्हर! एकाच दिवसात ३ सुपर ओव्हर झाल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पडला पाऊस
आयपीएल २०२०: पंजाबच्या विजयानंतर प्लेऑफसाठी चूरस वाढली; पाहा अशी आहे गुणतालिका
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…