इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५१ धावांनी विजय मिळवला होता. या दोन्ही सामन्यात भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी अप्रतिम फलंदाजी केली आहे. ज्यामुळे आगामी कसोटी सामन्यांमध्ये देखील हीच जोडी मैदानात उतरेल यात काही शंका नाही. ही कामगिरी अशीच सुरू राहिली तर संघातील आणखी एका फलंदाजाच्या कारकिर्दीवर पूर्णविराम लागू शकतो.
मयंक अगरवालची कारकीर्द धोक्यात!
इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून शुबमन गिल दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर सलामीवीर फलंदाज म्हणून मयंक अगरवालला पसंती दिली गेली होती. परंतु पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी तो दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे त्याला संघात स्थान दिले गेले नव्हते. त्याच्याऐवजी संधी मिळालेल्या केएल राहुलने संधीचे सोने करत भारतीय संघात स्थान निश्चित केले आहे. त्याने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते, तर दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे.
केएल राहुल आणि शुबमन गिल व्यतिरिक्त पृथ्वी शॉ देखील या रांगेत आहे. पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल हे दोघेही युवा फलंदाज आहेत तसेच दोघेही अप्रतिम फलंदाजी करतात. त्यामुळे मयंक अगरवालपेक्षा पृथ्वी शॉ आणि शुबमन गिलला जास्त संधी दिली जाऊ शकते. या संघात इतके प्रतिभाशाली खेळाडू असताना मयंक अगरवालला संधी मिळणे कठीण दिसून येत आहे.(Mayank Agarwal test career is almost over, kl rahul Prithvi shaw and Shubman gill are doing their best)
इंग्लंड संघाविरुद्ध मयंकला संधी मिळणे कठीण!
भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने सिलेक्ट काउंटी ईलेव्हन संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात १५० चेंडूंमध्ये १०१ धावांची खेळी केली होती. तसेच लॉर्ड्स कसोटी सामन्यात त्याने १२९ धावांची तुफानी खेळी केली होती. असा फॉर्म पाहता त्याला संघाबाहेर करणे कठीण दिसून येत आहे.
जर केएल राहुल दुखापतग्रस्त झाला, तरच त्याच्यासाठी जागा रिकामी होईल. पण अशावेळी पृथ्वी शॉचा सलामीचा पर्यायही उपलब्ध असेल. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला त्याला प्रथम प्राधान्य देऊ शकतो. म्हणून कोणत्याही बाजूने मयंकने कसोटी संघात पुनरागमन होणे शक्य दिसत नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’ देतोय विराटच्या साम्राज्याला आव्हान! हेडिंग्ले कसोटी ठरणार महत्वपूर्ण?
‘या’ दिवशी युएईसाठी उड्डाण भरणार दिल्ली कॅपिटल्सचा ताफा, पण कर्णधाराचा निर्णय गुलदस्त्यात
विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या ‘या’ भारतीयाचे टी२० विश्वचषकातील स्थान अनिश्चित, भिडूपासूनच आहे धोका!