ग्वाल्हेरमध्ये बांग्लादेशविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मयंक यादवला भारतीय क्रिकेटचा पुढचा वेगवान स्टार म्हणून ओळखले जात आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मेडन ओव्हरने केली. त्यानंतर जवळपास 150 किमीचा सर्वात वेगवान चेंडू टाकून त्याने दाखवून दिले की भारतीय संघाचे भविष्य सुरक्षित हातात आहे. मयंक यादवच्या आधी उमरान मलिकनेही असाच आत्मविश्वास व्यक्त केला होता. ज्याने ताशी 156 किमी वेगाने चेंडू टाकला होता. पण सध्याच्या घडीला तो संघाबाहेर आहे. या बातमीद्वारे आपण मयंक यादव आणि उमरान मलिक यांची ऑक्शन, स्पीड, दुखापतीची चिंता आणि भविष्यातील संभावनांबद्दल तुलना करूया.
उमरान मलिक : वय, स्पीड
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक हा जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे, त्याचे वय 24वर्षे आहे. आपल्या वेगासाठी प्रसिद्ध झालेला उमरान मलिक आयपीएल 2022 मध्ये चमकला. जेव्हा त्याने 150 किमी/तास वेगाने गोलंदाजी केली. आजही तो भारतीय क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्या हंगामात त्याने आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादसाठी किलर गोलंदाजी केली.
मयंक यादव : वय, स्पीड
उमरान मलिकप्रमाणेच मयंक यादवही उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. नवी दिल्लीत जन्मलेला मयंक सध्या 22 वर्षांचा आहे. आयपीएल 2024 मध्ये, त्याने 156.7 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. बांगलादेशविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने साधारणत; 149.9 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली.
उमरान मलिक: सामर्थ्य आणि कमकुवतपणा
उमरानच्या वेगामुळे फलंदाज घाबरतात. जरी त्याच्याकडे स्पीड असले तरी, त्याचे लाईन-लेंथवर नियंत्रण नाही. म्हणूनच तो अनेकदा खूप महागडा ठरतो. प्रत्येक वेगवान गोलंदाजाप्रमाणेच उमरानसाठीही फिटनेस ही मोठी समस्या बनली आहे.
मयंक यादव: सामर्थ्य-कमकुवतपणा
दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये फक्त दोन लिस्ट ए सामने खेळूनही, त्याला 2023 मध्ये नवीन आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सने करारबद्ध केले. पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगामासाठी बाहेर होता. आयपीएल 2024 च्या त्याच्या पदार्पणाच्या हंगामात, त्याने आरसीबी विरुद्ध 156.7 चा स्पीड नोंदवला. मयंककडे स्पीड आणि भिन्नता आहे. ज्याने तो फलंदाजांना चकवा देण्याचा प्रयत्न करतो. उमरान मलिकप्रमाणेच मयंकही दुखापतींमुळे त्रस्त आहे.
उमरान मलिक: पदार्पणात कामगिरी
भारताकडून 10 एकदिवसीय आणि 8 टी20 सामने खेळल्यानंतर उमरान मलिक संघाबाहेर आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2023 मध्ये खेळला. उमरान मलिकला आयर्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात फक्त एकच षटक टाकण्याची संधी मिळाली. ज्यात त्याने 12 धावा दिल्या.
मयंक यादव: पदार्पणात कामगिरी
आयपीएल 2024 मध्ये केवळ चार सामने खेळून स्पर्धेतून बाहेर पडला होता. मयंक यादवनेही आपल्या पदार्पणाच्या टी-20 सामन्यात बांग्लादेशविरुद्ध चार षटकांत केवळ 21 धावा देऊन एक विकेट घेतली होती.
हेही वाचा-
हा भारतीय क्रिकेटपटू होणार पिता, सोशल मीडियावर शेअर केली खुशखबर
क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! टीम इंडिया एकाच वेळी दोन सामने खेळणार
5-5 षटकांचा सामना, संघात केवळ 6 खेळाडू, या अनोख्या स्पर्धेत टीम इंडिया घेणार भाग