---Advertisement---

व्हिडिओ: टीम इंडियाला पाठिंबा देणाऱ्या कोण आहेत या ८७ वर्षीय आजी, जाणून घ्या

On: बुधवार, जुलै 3, 2019 2:13 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। मंगळवारी(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 28 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने उपांत्य फेरीतील स्थानही पक्के केले आहे.

भारताच्या विजयाबरोबर मंगळवारी हा सामना पहाण्यासाठी स्टेडीयममध्ये उपस्थित असणाऱ्या एक वयोवृद्ध आजी चांगल्याच चर्चेत होत्या. त्यांची खूद्द भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मानेही आवर्जून भेट घेतली.

या आजी 87 वर्षीय असून क्रिकेटच्या मोठ्या चाहत्या आहेत. त्यांचे नाव चारुलता पटेल असे आहे. या आजी भारताला सामन्यादरम्यान मोठ्या उत्साहाने प्रोत्साहन देताना दिसून आल्या होत्या. हा सामना संपल्यानंतर विराट आणि रोहितने या आजींची भेट घेतली. तसेच त्यांच्याबरोबर संवादही साधला. याचे फोटो आणि व्हिडीओ बीसीसीआय आणि आयसीसी शेअर केले आहेत.

सामन्यानंतर चारुलता आजी म्हणाल्या, त्या जेव्हा अफ्रिकामध्ये राहत होत्या तेव्हा मागील काही दशकांपासून त्या क्रिकेट पाहत होत्या. त्यावेळी त्या टीव्हीवर सामने पाहत होत्या. पण आता त्या रिटायर झाल्याने स्टेडीयममध्ये येऊन सामना पाहत आहेत. तसेच त्यांची मुले क्रिकेट खेळायची त्यामुळे त्यांना क्रिकेटची आवड लागली.

त्याचबरोबर बीसीसीआयने रोहित आणि विराटने या आजींची भेट घेतल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आजी म्हणाल्या, ‘मला खूप छान वाटत आहे. जसे काय मी माझ्या मुलाला भेटत आहे. मला माझ्या देशातील मुले खेळत असल्याचे पाहून छान वाटते. माझे आशिर्वाद नेहमीच त्यांच्याबरोबर असतील.’

तसेच आजींनी भारतीय संघ विश्वविजेतेपद मिळवतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला आहे.

विराटनेही चारुलता आजींबरोबरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि म्हटले आहे की ‘मी आमच्या सर्व चाहत्यांचे त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद म्हणेल. विशेषत: चारुलता पटेल जी यांचे. त्या 87 वर्षाच्या आहेत आणि मी पाहिलेल्या समर्पित चाहत्यांपैकी एक आहेत.’

‘वय हा फक्त आकडा आहे. तूमची जिद्द तूम्हाला मर्यादेपलीकडे घेऊन जाते. त्यांच्या आशिर्वादाबरोबरच आता आम्ही स्पर्धेत पुढे गेलो आहे.(उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.)’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी – अंबाती रायडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

विश्वचषकात रोहित शर्मा-केएल राहुल जोडीने रचला मोठा इतिहास

रोहित शर्मा, विराट कोहलीने एकाच सामन्यात केला तो खास पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment