बांगलादेशने कसोटी मालिकेत पाकिस्तानचा 2-0 असा पराभव केला. बांगलादेशने केवळ पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला नाही तर क्लीन स्विपही केला. बांगलादेशच्या या विजयाचा हिरो ठरला मेहदी हसन, ज्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला. मेहदी हसनने बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी करत बांगलादेशला कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने सर्वांची मन जिंकेल, अशी कृती केली आहे.
मालिकावीर बनल्यानंतर मेहदी हसनला बक्षीस म्हणून 5 लाख पाकिस्तानी रुपये म्हणजेच अंदाजे 1.5 लाख भारतीय रुपये देण्यात आले. मात्र, त्याने हा पुरस्कार एका रिक्षाचालकाला आणि बांगलादेशातील आंदोलनात मारल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना समर्पित केला. त्याच्या या कृतीमुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले मेहदी हसन?
बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयानंतर मेहदी हसन म्हणाला, ‘आपल्या देशात संकट आले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. मी माझा प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार निषेधादरम्यान मरण पावलेल्या विद्यार्थ्यांना समर्पित करतो. या आंदोलनात एक रिक्षाचालकही जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. मला माझा पुरस्कार त्यांना द्यायचा आहे.’
Mehedi Hasan Miraz donated his Man of the Series prize money to the family of a rickshaw puller who was martyred in the student movement against discrimination! 🇧🇩
Loml for a reason pic.twitter.com/i7GXYlNprh— ♡🍉 (@DillDiyanGallan) September 3, 2024
मेहदी हसनची कामगिरी
बांगलादेशच्या या अष्टपैलू खेळाडूने 2 सामन्यात 155 धावांचे योगदान दिले. त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके आली. बांगलादेश संघ अडचणीत असताना मेहदी हसनच्या या महत्त्वपूर्ण खेळी केल्या होत्या. त्याची फलंदाजी सरासरी 77.50 होती. या खेळाडूने 2 कसोटीत 10 विकेट्सही घेतल्या होत्या. एका डावात एकदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्याने केला. मेहदी हसनने तो बांगलादेशचा ट्रबलशूटर असल्याचे दाखवून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. संघाला जेव्हा गरज असते तेव्हा तो आपली ताकद दाखवतो. आता मेहदी हसनची खरी कसोटी भारत दौऱ्यावर असेल. बांगलादेश संघालाही भारत दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या कसोटी मालिकेची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराची भारताला चेतावणी, वाचा काय म्हणाला?
हरभजन सिंगच्या सल्ल्यामुळे कोहली आहे दिग्गज खेळाडू? माजी खेळाडूने केला खुलासा
मोहम्मद शमी किती श्रीमंत आहे? वाढदिवसादिनी जाणून घ्या एकूण संपत्ती