आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता हा हंगाम यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संघ युएईमध्ये पोहचले आहेत. पण याचदरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघातील कमीत कमी १० सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या सदस्यांमध्ये एका भारतीय खेळाडूचाही समावेश आहे. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंची आणि सपोर्ट स्टाफची गुरुवारी कोरोना चाचणी घेण्यात आल्यानंतर हा अहवाल आला आहे.
तसे पाहिले तर युएईला पोहचल्यानंतर प्रत्येक संघातील सदस्यांची विमानतळावर कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ६ दिवसांसाठी सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यावेळी पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात येणार होती. त्यानंतरच त्यांना जैव-सुरक्षित वातावरणात प्रवेश दिला जाणार आहे.
पण २१ ऑगस्टला युएईमध्ये पोहचलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघातील सदस्यांचा क्वारंटाईनच्या ५ व्या दिवशी करण्यात आलेल्या चाचणीनंतर पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्सच्या सदस्यांचा क्वारंटाईनचा कालावधी वाढविण्यात आल्याने त्यांच्या ट्रेनिंगलाही उशिरा सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
सीपीएलमध्ये चालली मोहम्मद नबीच्या फिरकीची जादू; दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात
बाप होणार विराट कोहली, पण ट्रोल होतोय सैफ अलीचा मुलगा तैमूर
आजपासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु होणाऱ्या टी२० मालिकेबद्दल जाणून घ्या सर्वकाही
ट्रेंडिंग लेख –
मुंबई इंडियन्सकडून फक्त १ सामना आला नशिबी, त्यातही ‘हे’ २ भारतीय क्रिकेटर ठरले फ्लॉप
लॉकडाऊन दरम्यान या ५ क्रिकेटपटूंनी दिली ‘गुडन्यूज’, ३ भारतीयांचा समावेश
‘या’ २ अष्टपैलू क्रिकेटर्ससाठी आयपीएल ठरणार लकी; भविष्यात मिळणार भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी?