भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील वनडे, टी२० मालिका संपवून हे दोन्ही संघ कसोटी मालिकेची जंग लढत आहेत. या लढतीतील पहिला सामना शनिवारी (१९ डिसेंबर) झाला. ऍडलेड येथे झालेल्या या दिवस- रात्र सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान भारतीय संघाने दुसऱ्या डावात अत्यंत वाईट फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय खेळाडू २ तासही टिकू शकले नाहीत आणि ३६ धावांवर त्यांनी डाव घोषित केला. यानंतर नाराज चाहत्यांनी सोशल मीडियावर मिम्सचा भडीमार केला आहे.
अधिकतर युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना चाहत्यांनी धारेवर पकडले आहे. एका चाहत्याने, तर शास्त्रींना उद्देशून “अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है” असे मिम शेअर केले आहे. तसेच एका चाहत्याने शास्त्री ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर पृथ्वी शॉला रागवतानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोवर “तुझ्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली,” असे लिहिले आहे.
इथे पाहा मिम्स :
https://twitter.com/AnkitdDreamer/status/1340165981147033600?s=20
What Ravi Shastri Told: What Prithvi Shaw Meant:#INDvAUS #PrithviShaw #RaviShastri pic.twitter.com/I5teah5RUn
— Kapil Varma (@OfficiallyKapil) December 19, 2020
https://twitter.com/safahkhan8/status/1339945262563864576?s=20
https://twitter.com/Joker87009983/status/1340167149071953920?s=20
https://twitter.com/yashh0_7/status/1340170171328020481?s=20
https://twitter.com/Axmeh_45/status/1340170523368632320?s=20
Ravi Shastri has booked the entire bus now for sightseeing it seems 😂😂😂#AusvInd pic.twitter.com/QeWHpZorqb
— Puneri guyy (@nayahaivahh) December 19, 2020
Word of Legend:- Prithvi Shaw have ability like Sachin Sehwag and Lara #INDvAUS
Ravi Shastri always rocks 🍻 pic.twitter.com/Wf9CLZLVpf
— K L Rahul FANS (@itsPRB) December 18, 2020
https://twitter.com/hate_chemistry/status/1340159099082735619?s=20
पहिल्या कसोटी सामन्याचा आढावा
पहिला डाव
ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २४४ धावा केल्या. यात कर्णधार विराट कोहलीच्या सर्वाधिक ७४ धावांचा समावेश होता. त्याने ८ चौकारांच्या मदतीने ही धावसंख्या गाठली होती. त्याच्याव्यतिरिक्त चेतेश्वर पुजाराने ४३ धावा आणि अजिंक्य रहाणेने ४२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर पॅट कमिन्सनेही ३ विकेट्सची कामगिरी केली होती.
भारताच्या पहिल्या डावातील २४५ धावांचा पाठलाग करत ऑस्ट्रेलिया संघ १९१ धावांवर सर्वबाद झाला होता. पॅट कमिन्सने सर्वाधिक नाबाद ७३ धावा केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त मार्नस लॅब्यूशानेने ४७ धावांचे योगदान दिले होते. उर्वरित फलंदाजांना २० धावाही करता आल्या नाहीत. भारताकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने ४ विकेट्स, उमेश यादवने ३ विकेट्स आणि जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेतल्या होत्या.
दुसरा डाव
पुढे भारतीय संघाने केवळ ३६ धावांवरच त्यांचा दुसरा डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोश हेजलवुड आणि पॅट कमिन्सच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. हेजलवुडने सर्वाधिक ५ आणि कमिन्सने ४ विकेट्स घेतल्या. दरम्यान एकही भारतीय फलंदाज दोन आकडी धावा करू शकला नाही. प्रत्युत्तरात मॅथ्यू वेड आणि जो बर्न्सच्या दमदार फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. बर्न्सने ५१ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर मॅथ्यू वेडनेही ३३ धावांचा हातभार लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
ग्रीनने घेतला विराटचा एव्हरग्रीन झेल आणि कमिन्सने पार केला विकेटचा मोठ्ठा टप्पा; पाहा व्हिडिओ
तीन बदक आणि लाजीरवाणा पराक्रम..! पाहा दुसऱ्या डावातील भारतीय फलंदाजांची सुमार कामगिरी