---Advertisement---

क्या करू मैं मर जाऊ! कुलदीपला चेन्नई कसोटीत संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याची आजपासून (५ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. विजयरथावर स्वार असलेले दोन्हीही संघ तगड्या अंतिम ११ जणांच्या पथाकसह मैदानावर उतरले आहेत. परंतु भारताचा कर्णधार विराट कोहली याने फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिलेली नाही. यामुळे सोशल मीडियावर कुलदीपचे मीम्स व्हायरल होत आहेत.

चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी सोईची असल्याने आर अश्विनसोबत कुलदीपला संधी मिळणे, जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जात होते. याबरोबरच फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर केल्याने कुलदीपच्या पुनरागमनाच्या आशा अजून वाढल्या होत्या. परंतु त्याला संधी न देता ३१ वर्षीय फिरकीपटू शाहबाज नदीमची निवड करण्यात आली. यामुळे ट्विटरवर कुलदीप सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

नेटकऱ्यांनी मीम्सद्वारे वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने, ‘एकदम एनपीके (बिनकामाची मालमत्ता) बनके रह गये है, असे मजेशीर मीम पोस्ट केले आहे.’ तर एकाने तारे जमीन पर चित्रपटातील फोटो शेअर करत, ‘क्या मै इतना बुरा हू विराट’, अशी विनोदी प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/__Muskurahat__/status/1357535424483262467?s=20

https://twitter.com/bhargav_prdip/status/1357543219530260480?s=20

https://twitter.com/Msdhoni_183/status/1357539471290322944?s=20

https://twitter.com/RomanEm73754515/status/1357539872504913920?s=20

या सामन्यातून भारतीय संघात नियमित कर्णधार कोहलीचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय भारतीय संघात इशांत शर्माचेही पुनरागमन झाले आहे. तसेच पहिल्या कसोटीसाठी अंतिम ११ जणांच्या संघात रिषभ पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळाली आहे. तर शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर हे अंतिम ११ जणांच्या संघात कायम आहेत. याबरोबरच शहाबाज नदीमलाही भारताच्या ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे.

इंग्लंड संघाचा विचार करायचा झाल्यास त्यांच्या ११ जणांच्या संघात अष्टपैलू बेन स्टोक्स, सलामीवीर रॉरी बर्न्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचे पुनरागमन झाले आहे. हा सामना इंग्लंडचा कर्णधार जो रुटचा १०० वा सामना आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ – 

भारतीय संघ – 

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम

इंग्लंडचा संघ – 

रॉरी बर्न्स, डोमिनिक सिबली, डॅनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर (यष्टीरक्षक), डोमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेम्स अँडरसन

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG Test Live : इंग्लंडने जिंकली नाणेफेक; ‘या’ खेळाडूंना मिळाली ११ जणांच्या संघात संधी

चेन्नई कसोटीपुर्वी सचिनचा इंग्लंडला मदतीचा हात, सांगितला भारतीय फलंदाजांना बाद करण्याचा उपाय

विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी ४ वर्षापासून तरसतोय ‘हा’ इंग्लंडचा गोलंदाज, पाहा कशी राहिली कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---