सध्या स्पोर्ट्स अथोरेटी ऑफ इंडिया (साई) सेंटरमध्ये भारतीय महिला आणि पुरुष कुस्तीपटूंचे राष्ट्रीय शिबिर चालू आहे. या शिबिरादरम्यान बजरंग पुनिया व्यतिरिक्त अन्य कुस्तीपटूंना १७ डिसेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी मिळाली आहे. जे कुस्तीपटू दिवाळीसाठी घरी गेले आहेत त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या सेंटरला रिपोर्टिंग करावे लागणार आहे.
तसेच सुट्टीवरुन परत सेंटरमध्ये परतल्यानंतर कुस्तीपटूंना ७ दिवसांसाठी एकांतवासात रहाणे अनिवार्य असेल. त्यानंतर ते वैयक्तिक सरावाला सुरुवात करु शकतात.
द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्ताप्रमाणे याबाबद भारतीय कुस्ती फेडरेशनचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले की साई आणि फेडरेशनने कुस्तीपटूंसाठी ५ दिवसांच्या सुट्टीची मंजूरी दिली आहे.
सुट्टीनंतर परत येताना कुस्तीपटूंना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यांना सेंटरमध्ये येण्याआधी कोविड निगेटीव्ह सर्टिफिकेट दाखवणे बंधनकारक असेल. तसेच त्यांना ७ दिवसांसाठी एकांतवासात रहावे लागेल. तसेच पुन्हा कोविड चाचणी करावी लागेल. त्यानंतर १४ दिवसांनीच ते ग्रुपमध्ये सरावाला सुरुवात करु शकतात.
…म्हणून बजरंग पुनियाने घेतली नाही सुट्टी
तसेच बजरंग दिवाळीसाठी घरी गेला नाही कारण तो त्याच्या लग्नासाठी नंतर एक आठवड्याची सुट्टी घेणार आहे. त्याचे लग्न २५ नोव्हेंबरला संगीता फोगटशी होणार आहे. संगीता भारताच्या स्टार महिला कुस्तीपटू गीता आणि बबीता फोगट यांची धाकटी बहिण आहे. तसेच संगीता देखील कुस्तीपटू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून बजरंग पुनिया आणि संगिता फोगटचे होणार नाही धुमधडाक्यात लग्न
विश्व कुस्ती चॅम्पियनशीप २०२० ऐवजी होणार ‘ही’ स्पर्धा, UWW चा मोठा निर्णय
साक्षी मलिकने रिओ ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्यासाठी ‘अशी’ घेतली होती मेहनत