भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने (Rahul Dravid) म्हटले आहे की क्रिकेटसारख्या खडतर खेळामध्ये मानसिक आरोग्य राखणे हे एक मोठे आव्हान आहे. तसेच व्यस्त वेळापत्रक आणि अनिश्चित भविष्याचा ताण सहन करण्यासाठी खेळाडूंनी मानिसक संतुलन राखले पाहिजे.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना द्रविड म्हणाला की, ‘हे एक मोठे आव्हान आहे. क्रिकेट हा एक कठीण खेळ आहे. यामध्ये खूप स्पर्धा आणि दबाव आहे. मुले वर्षभर खेळत असतात. या खेळामध्ये बर्याच वेळा आपल्याला वाट पाहावी लागते. तसेच विचार करण्यासाठी खूप वेळ असतो,’ असे द्रविड म्हणाला.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि युवा विल पुकोव्स्की (Will Pucovski) यांच्यासह तीन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी मानसिक त्रास होत असल्याचा संदर्भ देत क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा(एनसीए) प्रमुख द्रविड म्हणाला की, स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी आरोग्याची काळजी घ्यावी.
‘तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी मैदानाच्या आत आणि बाहेरही घ्यावी लागेल. संतुलन राखणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला यश मिळेल तेव्हा तुम्ही खूप आनंदीत होऊ नका आणि आपण अपयशी ठरल्यास निराशही होऊ नका,’ असे द्रविड म्हणाला.
द्रविड म्हणाला की एनसीएमध्ये अशी व्यवस्था करायची आहे की खेळाडूला आवश्यक असल्यास व्यावसायिक मदत मिळेल.
‘आता काम चालू आहे आणि अशी वेळ येईल जेव्हा प्रत्येक खेळाडूला आवश्यक असल्यास व्यावसायिक मदत मिळू शकेल. प्रशिक्षक किंवा आम्ही बर्याच समस्यांवर मात करू शकत नाही. अशा परिस्थितीत व्यावसायिकांची मदत घेणे आवश्यक आहे,’ असेही द्रविड म्हणाला.
पुढीलवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वचषकाविषयी द्रविड म्हणाला की, ज्यांची संघात निवड झाली नाही त्यांच्यासाठी मार्ग संपत नाही. तसेच ज्यांना संघात स्थान मिळते त्यांनी वरिष्ठ संघात त्यांची निवड निश्चित झाली आहे असे समजू नये.
बुमराह, चाहरचा समावेश असणाऱ्या या यादीत आता श्रेयस गोपाळचे नावही सन्मानाने घेतले जाणार
वाचा👉https://t.co/lZrNNCKbH8👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #HARvKAR #MushtaqAliT20— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019
हॅट्रिकसह एकाच ओव्हरमध्ये ५ विकेट्स घेत अभिमन्यू मिथूनने रचला इतिहास
वाचा👉https://t.co/4YtqABX4e8👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #abhimanyumithun— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019