नव्याने आयपीएल २०२२हंगामात सामील झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने बुधवारी (दि. १८ मे) दिमाखात प्लेऑफ फेरी गाठली. त्यांनी आयपीएलच्या ६६व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला अवघ्या २ धावांनी पराभूत केले. या विजयानंतर लखनऊच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सर्वजण एकच जल्लोष करत होते. संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर यानेही जबरदस्त जल्लोष केला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना २१० धावा चोपल्या होत्या. या धावा एकही विकेट न गमावता सलामीवीर केएल राहुल (६८) आणि क्विंटन डी कॉक (१४०) यांनी चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत २०८ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना नजीकचा पराभव पत्करावा लागला. यासह त्यांचा प्लेऑफचा प्रवास इथेच संपला.
कोलकाताला २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात २१ धावांची आवश्यकता होती. यावेळी केएल राहुलने मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) याला गोलंदाजी दिली. तसेच, रिंकू सिंग (Rinku Singh) याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारल्यानंतर पुढील २ चेंडूवर सलग षटकार खेचले आणि सामना कोलकाताच्या बाजूने वळवला. शेवटच्या ३ चेंडूंवर कोलकाताला ५ धावांची आवश्यकता होती. चौथ्या चेंडूवर रिंकूने २ धावा घेतल्या. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो ४० धावांची वादळी खेळी खेळत झेलबाद झाला. रिंकूला एविन लुईसने शानदार झेल घेत तंबूत धाडले. त्यानंतर कोलकाताला शेवटच्या चेंडूवर ३ धावांची आवश्यकता होती. तसेच, स्ट्राईकवर उमेश यादव होता. स्टॉयनिसने शानदार यॉर्कर टाकला आणि उमेशच्या दांड्या गुल करत सामना खिशात घातला.
WHAT. A. GAME !!@LucknowIPL clinch a thriller by 2 runs.
Scorecard – https://t.co/NbhFO1ozC7 #KKRvLSG #TATAIPL pic.twitter.com/7AkXzwfeYk
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या रोमांचक विजयानंतर डगआऊटमध्ये बसलेला लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) भलताच आनंदात दिसला. त्याने यादरम्यान सहकाऱ्यांना गळाभेटही दिली. तो त्याच्या याच अंदाजासाठी ओळखला जातो. अशात चाहत्यांनाही त्याचे हे रूप पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, गंभीरने त्याच्या नेतृत्वात कोलकाता संघाला २ वेळा आयपीएलचा किताब जिंकून दिला आहे. आता त्याने त्याच्या माजी संघाविरुद्ध जल्लोष केला आहे.
https://twitter.com/chalakbillllu/status/1526986874266390529?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1526986874266390529%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-gautam-gambhir-reaction-went-viral-after-lsg-stupendous-victory-over-kkr-watch-video-6511355.html
लखनऊ सुपर जायंट्स हा संघ आयपीएल २०२२च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरचा कोलकाता संघ या हंगामातून बाहेर पडला आहे.