आयपीएल २०२०चा अंतिम सामना आज (मंगळवार, १० नोव्हेंबर) दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याच रंगणार आहे. प्लेऑफमधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईने दिल्लीला ५७ धावांनी नमवत अंतिम सामना गाठला. सोबतच दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीने सनरायझर्स हैदराबादला १७ धावांनी पराभवाची धूळ चारली आणि अंतिम सामन्यात धडक मारली. या हंगामात हे दोन्ही संघ यापूर्वी २वेळा आमने- सामने आले आहेत. त्या दोन्ही सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे.
मुंबईचे जवळपास सर्वच खेळाडू या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. फलंदाजी विभागापासून ते गोलंदाजी विभागापर्यंत सर्वांनी संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. क्विंटन डी कॉक, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांची फलंदाजी आणि जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांच्या गोलंदाजीने कहर माजवला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म बिघडलेला दिसत आहे.
दिल्लीच्या खेळाडूंनी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादविरुद्ध शानदार विजय मिळवला होता. हंगामाच्या सुरुवातीपासूनच या संघाने त्यांचा दबदबा निर्माण केला आहे. पण साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यात त्यांची गाडी डगमगली. तरीही प्लेऑफमध्ये दमदार पुनरागमन करत त्यांनी अंतिम सामन्याची सीमारेषा ओलांडली. पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवल्यामुळे यंदा विजेता बनण्यासाठी दिल्लीचे खेळाडू जिवाचे रान करताना दिसतील.
दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल आणि जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
FINAL : स्म्रीती मंधानाची फलंदाजी पडली सुपरनोवाजवर भारी, पहिल्यांदाच पटकावली ट्रॉफी
रबाडाने घेतल्या तीन चेंडूत तीन विकेट्स, तरीही हुकली हॅट्रिक; जाणून घ्या कारण
‘फायनलमध्ये न पोहोचणे लज्जास्पद’, हैदराबादच्या शिलेदाराने व्यक्त केल्या भावना
ट्रेंडिंग लेख-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ