भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला आयपीएल २०२२च्या शेवटच्या टप्प्यात सूर गवसला. शनिवारी (दि. २१ मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएलच्या १५व्या हंगामातील ६९वा सामना पार पडला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबईच्या वेगवान बुमराहने सलग २ षटकात दिल्लीचे २ फलंदाज तंबूत धाडले. यातील एका फलंदाजाला त्याने असे काही बाद केले की, त्यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि डेविड वॉर्नर (David Warner) यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी वॉर्नर फार काळ टिकला नाही, त्याला डॅनियल सॅम्सने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद केले. यानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मिशेल मार्श (Mitchell Marsh) याला गोल्डन डकवर म्हणजेच शून्य धावेवर तंबूत धाडले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अशी घेतली पृथ्वी शॉ याची विकेट
मुंबईला विकेटची खूपच गरज होती. यावेळी मुंबईने पुन्हा एकदा बुमराहकडे गोलंदाजी सोपवली. डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आलेल्या बुमराहने असा काही चेंडू टाकला की, पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्याकडे त्या चेंडूचे कोणतेही उत्तर नव्हते. बुमराहने टाकलेला चौथा चेंडू शॉने पुल खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुमराहचा बाऊंसर शॉला समजलाच नाही. त्याने जोरात बॅट फिरवली. यावेळी चेंडू त्याच्या बॅटची कड घेत मागे गेला आणि ईशान किशनने शानदार पद्धतीने हा झेल घेतला. यावेळी शॉ जमिनीवर धपकन कोसळल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.
https://twitter.com/credbounty/status/1528030989028835328?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1528030989028835328%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.news18.com%2Fcricketnext%2Fnews%2Fipl-2022-jasprit-bumrahs-lethal-bouncer-undones-prithvi-shaw-dc-opener-gets-out-in-a-bizarre-fashion-watch-5222173.html
उभय संघातील बदल
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात मुंबईच्या ताफ्यात २ बदल झाले आहेत. डेवाल्ड ब्रेविस आणि ऋतिक शोकीन यांना ट्रिस्टन स्टब्स आणि संजय यादव यांच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, दिल्ली संघात टायफॉईडमधून बरा झाल्यानंतर पृथ्वी शॉ याची एंट्री झाली आहे. त्याला ललित यादवच्या जागी घेतले आहे. दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, मुंबईने हा सामना जिंकला, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ प्लेऑफमध्ये एंट्री घेईल.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलचं टेन्शन विसरून श्रेयस अय्यर करतोय नुसता एंजॉय, बहिणीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ‘करो वा मरो’ सामन्यात दिल्लीच्या धडाकेबाज पठ्ठ्याचे कमबॅक