आयपीएल२०२० मध्ये बुधवारी(२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध अबु धाबी येथे झालेल्या सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादव आणि बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये खुन्नस पाहायला मिळाली.
या सामन्यात मुबंईच्या विजयात सुर्यकुमारने महत्त्वाचा वाटा उचलला. मुंबईकडून १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ४३ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७९ धावा केल्या. एकावेळी मुंबई ७२ धावांवर ३ बाद अशा अवस्थेत असताना त्याने शेवटपर्यंत टिकून मुंबईला विजय मिळवून दिला.
यादरम्यान तो १३ व्या षटकात ४० धावांवर फलंदाजी करत असताना विराट आणि त्याच्यामध्ये खुन्नस पहायला मिळाली. झाले असे की हे षटक डेल स्टेन टाकत होता. त्याच्या ५ व्या चेंडूवर सुर्यकुमारने चौकार ठोकला होता. तर शेवटच्या चेंडूवर सुर्यकुमारने कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. यावेळी तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने तो चेंडू लगेचच पकडला. त्यामुळे सुर्यकुमारला धाव घेता आली नाही. मात्र विराटने चेंडू पकडल्यानंतर तो सुर्यकुमार यादवच्या दिशेने चालत येत असलेला दिसला.
यावेळी विराट सुर्यकुमारकडे भेदक नजरेने पाहात असल्याचेही दिसले. त्यावर सुर्यकुमारनेही विराटवरील नजर हाटवली नाही. त्यानेही त्याच्याकडे नजर रोखून ठेवली. यानंतर विराट सुर्यकुमारच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्यानंतर लगेचच सुर्यकुमार तिथून काहीही न बोलता निघून गेला.
https://twitter.com/vishalghandat1/status/1321498783461502976
Here's the full video… SKY 🙌 https://t.co/QnyF2LYRag
— GYPSY🕊️ (@Gypsy_offl) October 28, 2020
https://twitter.com/ROxSSR45/status/1321495694230740998
I don't know whether it was about the selection or not but what Kohli has done today was not in good taste.
No matter why Naseeruddin Shah called him world's worst behaved cricketer.
.
.
.#IPL #IPL2020 #MIvsRCB#MIvRCB #ViratKohli #Kohli#SuryakumarYadav #RCB #MI#Yadav #Mumbai pic.twitter.com/KXDbaEIia0— Gandharv Sharma (@gandharvsharmaa) October 28, 2020
या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना देवदत्त पड्डीकलने केलेल्या ७४ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मुंबईने सुर्यकुमारच्या नाबाद खेळीच्या जोरावर १९.१ षटकातच १६६ धावा करत ५ विकेट्सने विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुर्यकुमारकडे दुर्लक्ष –
२६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठी भारतीय संघात सुर्यकुमारची निवड होईल, असे अनेकांना अपेक्षित होते. मात्र त्याची एकाही भारतीय संघात निवड झाली नाही. त्यामुळे अनेक दिग्गजांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चाहत्यांनाही सुर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न केल्याने विराटवर निशाणा साधला होता.
पुढील महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ३ टी२०, ३ वनडे आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
सुर्यकुमारला केलेलं ट्विट माझ्यासाठीही केलं असतं तर माझंही करियर वाचलं असतं!
ब्रेकिंग- भारताविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
ट्रेंडिंग लेख-
-Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
-SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर
-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय