आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव करत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. MI vs GT आता मुंबईचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. (IPL 2025 Eliminator)
टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 228 धावांचा भक्कम डोंगर उभारला. ज्यामध्ये रोहित शर्माने (81 धावा) आक्रमक अर्धशतक ठोकत शानदार सुरुवात करून दिली. जाॅनी बेअरस्टो (47), सूर्यकुमार यादव (33) हार्दिक पांड्या (22) यांनीही उपयोगी खेळ करत संघाला मोठं स्कोअर उभारण्यात मदत केली. (Rohit Sharma 81 runs)
प्रत्युत्तरादाखल गुजरातची सुरुवात खराब झाली. कर्णधार शुबमन गिल फक्त 1 धाववर बाद झाला. त्याला ट्रेंट बोल्टने एलबीडब्ल्यू केले. मात्र, त्यानंतर साई सुदर्शन आणि कुशल मेंडिस यांनी 64 धावांची भागीदारी करत डाव सावरला. मेंडिस 20 धावा काढून बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शनने वॉशिंग्टन सुंदरसोबत 84 धावांची धडाकेबाज भागीदारी केली. सुंदरने फक्त 24 चेंडूत 48 धावा करत सामना गुजरातच्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न केला.
Two moments of brilliance ⚡️
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
Were these two the defining moments of the #Eliminator? ????
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph#TATAIPL | #GTvMI | #TheLastMile | @mipaltan pic.twitter.com/7hDL0s5Mye
मात्र डावाच्या 14व्या षटकात जसप्रीत बुमराहने सुंदरला शानदार याॅर्करवर क्लीन बोल्ड करत सामन्यात निर्णायक वळण आणले. (Jasprit Bumrah Bowled Sunder) त्यानंतर गुजरातची फलंदाजी कोसळली. त्यानंतर साई सुदर्शन (80) शेरफान रदरफोर्ड (24), शाहरुख खान (13) आणि राहुल तिवेटिया (16) झटपट बाद झाले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरातचा 20 धावांनी पराभव झाला.






