आयपीएल 2023चा 69वा सामना रविवारी (21 मे) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि वरच्या फळीतील कॅमरून ग्रीन यांनी महत्वपूर्ण धावा केल्या. कॅमरून ग्रीन याने आयपीएलमध्ये आपले पहिले शतक ठोकले. यावर्षी आयपीएलचा हा 16 वा हंगाम सुरू असून आतापर्यंत एकूण 9 शतके पाहायला मिळाली आहेत.
एकंदरीत पाहता आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये गोलंदाजांपेक्षा फलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळाले आहे. हंगामात बहुतांश सामन्यांमध्ये संघ 200पेक्षा मोठी धावसंख्या संघांनी केली आहे. यावर्षी आयपीएलमध्ये तब्बल 9 फलंदाजांनी शतके केली आहेत. यापूर्वी कधीच आयपीएलमध्ये एका हंगामात 9 शतके आली नव्हती. हॅरी ब्रुक (100*), वेंकटेश अय्यर (104), यशस्वी जयस्वाल (124), सूर्यकुमार यादव (103*), प्रभसिमरन सिंग (103), शुबमन गिल (101), हेनरिक क्लासेन (104), विराट कोहली (100) आणि कॅमरून ग्रीन (100*) या एकूण 9 फलंदाजांनी यावर्षी शतके केली आहेत. मागच्या वर्षी म्हणजेच आयपीएल 2022मध्ये सर्वाधिक 8 शतके पाहायला मिळाले होते. मात्र, यावर्षी हा विक्रम मोडीत निघाला. त्याआधी आयपीएल 2016मध्ये सर्वाधिक 7 शतके पाहायला मिळाली होती.
आयपीएल हंगामात सर्वाधिक शतके करणारे
9* – आयपीएल 2023
8 – आयपीएल 2022
7 – आयपीएल 2016
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबद यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मुंबईने 8 विकेट्सने विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 200 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स 18व्या षटकात 2 विकेट्स गमावून विजय मिळवला. मुंबईने जर हा सामना 11.5 षटकांमध्ये जिंकला असता, तर त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यापासून कोणीच आडवू शकत नव्हते. मात्र, तसे झाले नाही. अशात मुंबईची प्लेऑफमध्ये संधी मिळणार की नाही? हे गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यानंतर ठरेल. (MI vs SRH Cameron Green scrored Hundred , First time 9 centuries in an IPL season!)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हिरो हिटमॅन! धुवांधार अर्धशतकासह मोठ्या विक्रमाला घातली गवसणी, पुढे फक्त विराटच
मुंबईच्या कर्णधारपदाला साजेसा विक्रम! आयपीएलमध्ये फक्त दोघांनाच जमली ‘ही’ कामगिरी