---Advertisement---

ग्रीनच्या शतकाने मुंबईचा धमाकेदार विजय! मात्र, प्ले ऑफ्स प्रवेशासाठी आरसीबीचा पराभव आवश्यक

---Advertisement---

मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023चा 69 वा सामना रविवारी (21 मे) खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने आठ गडी राखून विजय मिळवला. कॅमेरून ग्रीनने झळकावलेले नाबाद शतक मुंबईच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. यासह मुंबईच्या प्ले ऑफमध्ये जाण्याची आशा कायम राहिली. 

 

यापूर्वी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या हैदराबाद संघाला मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हैदराबादसाठी मयंक अगरवाल व विवरांत शर्मा यांनी सलाम  दिली. दोघांनी 13.5 षटकात 140 धावा काढल्या. मयंकने ‌‌‌‌‌46 चेंडूत 83 धावा फटकावल्या. तर शर्माने त्याला 69 धावा काढत साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर मात्र मुंबईचा गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. युवा आकाश मधवाल याने चार बळी मिळवले. जॉर्डनसह अखेरच्या चार षटकात ‌ त्याने केवळ 26 धावा खर्च केल्या. मार्करमने अखेरच्या चेंडूवर षटकार मारल्याने हैदराबाद 200 पर्यंत मजल मारू शकली.

या धावांचा पाठलाग करताना मुंबईला रोहित शर्मा व ईशान किशन यांनी पुन्हा एकदा चांगली सुरुवात दिली. ईशान 14 धावा करत बाद झाला. त्यानंतर मात्र रोहित व तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या कॅमेरून ग्रीन यांनी शतकी भागीदारी रचली. रोहितने त्याने 37 चेंडूवर 56 धावा केल्या. यामध्ये 8 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. रोहित बास झाल्यानंतर ग्रीन याला सूर्यकुमार यादवने साथ दिली. दोघांनी हैदराबादच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. 18 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ग्रीनने विजयी धाव घेत आपले शतकही पूर्ण केले.

विजय मिळवला असला तरी मुंबईला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आरसीबीचे पराभूत होणे गरजेचे आहे. अन्यथा आरसीबी चौथ्या स्थानी राहिल.

(Mumbai Indians Beat Sunrisers Hyderabad By 8 Wickets Cameron Green Hits Maiden IPL Century)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईला मिळाला नवा ‘यॉर्कर स्पेशालिस्ट’! मधवालच्या गोलंदाजीपुढे क्लासेन-ब्रूक गुडघ्यावर

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---