न्यूझीलंडविरुद्धच्या तिसरा टी-20 सामना बुधवारी (1 फेब्रुवारी) अहमदाबादमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात 168 धावांनी विजय मिळवला. शुबमन गिल याने संघासाठी नाबाद 126 धावांची खेळी केली आणि संघाची धावसंख्या 200 पार पोहोचवली. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी देकील नेत्रदीपक कामगिरी केली. युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने टाकलेला एक चेंडू सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ T20 Series) यांच्यातील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल (Shubman Gill) याच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने 20 षटकांमध्ये 4 बाद 234 धावा कुटल्या. गिलव्यतिरिक्त कर्णधार हार्दिक पंड्या याने 30, तर राहुल त्रिपाठी याने 44 धावांची खेळी केली. संघातील प्रत्येक फलंदाज खेळपट्टीवर आल्याबरोबरी फटकेबाजीला सुरुवात करताना दिसला. परिणामी संघाने ही मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्यूत्तरात न्यूझीलंड संघ मात्र अवघ्या 66 धावांवर सर्वबाद झाला.
न्यूझीलंड संघ फलंदाजी आल्यानंतर पहिल्या षटकापासून भारतीय गोलंदाजांनी धमाकेदार प्रदर्शनाला सुरुवात केली. पहिल्याच षटकात कर्णधार हार्दिक पंड्या याने सलामीवीर फिन एलन याची विकेट घेतली. चर्चा विषय ठरली ती पाचव्या षटकातील मायकल ब्रेसवेल (Michael Bracewell ) याची विकेट. भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) या षटकात भारतासाठी गोलंदाजी करत होता. षटकातील तिसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर स्टंप्समध्ये घुसला आणि ब्रेसवेलचा त्रिफळा उडाला. चेंडूचा वेगव एवढा जास्त होता की, चेंडू स्टंप्सला लागल्यानंतर बेल्स 30 यार्ड सर्कलपर्यंत जाऊन पडली होती. उमरानच्या या चेंडूचा व्हिडिओ बीसीसीआयने देखील पोस्ट केला आहे. जम्मु कश्मीर एक्सप्रेस म्हणून नावारुपाला येणाऱ्या उमरानची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते. बुधवारी त्याने ब्रेसवेलची घेतलेली विकेट चांगलीच चर्चेच आहे.
Umran Malik comes into the attack and Michael Bracewell is bowled for 8 runs.
A beauty of a delivery from Umran 💥
Live – https://t.co/1uCKYafzzD #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/nfCaYVch4b
— BCCI (@BCCI) February 1, 2023
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर 235 धावांचा पाठलाग करताण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाचा एकही फलंदाज 35 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. डार्ली मिचेल (35) आणि मिचेल सॅटनर (13) व्यातिरिक्त न्यूझीलंडचा एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. भारतासाठी हार्दिक पंड्याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग, शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. (Michael Bracewell was clean bowled by Umran Yadav’s dangerous delivery)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेम टू सेम! एकाच जागेवर सूर्या-हार्दिकच्या जोडीने फसवले न्यूझीलंडचे दोन फलंदाज; पाहा व्हिडिओ
वन ऍण्ड ओन्ली हार्दिक! टी20 क्रिकेटमध्ये पंड्याशिवाय ‘त्या’ कामगिरीच्या जवळपासही कोणी नाही