---Advertisement---

दिग्गजाने कमिन्ससह ४ ऑसी गोलंदाजांना ओढले बॉल टेम्परिंग प्रकरणात; म्हणाला, “त्यांच्या साथीदाराने…”

Crickt Australia Pat Cummins
---Advertisement---

सन २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेले बॉल टेम्परिंग प्रकरण चांगलेच गाजलेले. या प्रकरणी दोषी आढळलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व कॅमेरून बेनक्रॉफ्ट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात शिक्षा झालेल्या बेनक्रॉफ्टने जवळपास अडीच वर्षांनंतर याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला होता.

त्याने ऑस्ट्रेलियाच्या इतर गोलंदाजांनाही या घटनेविषयी माहिती असल्याचे सांगितले होते. परंतु ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपली बाजू मांडत बचाव केला होता. परंतु माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्क मात्र गोलंदाजांच्या स्पष्टीकरणावर खुश नाही.

मायकेल क्लार्क म्हणाला की, “चारही गोलंदाजांनी स्पष्टीकरण दिले. परंतु या प्रकरणात त्यांचा सहभाग हा बाहेरील व्यक्तीने नव्हे तर साथीदारांनी दर्शविला होता. हा महत्त्वाचा मुद्दा कदाचित ते विसरले.”

क्लार्कने ‘स्काई स्पोर्ट्स’ रेडिओशी बोलताना सांगितले, “जेव्हा मी कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली. तेव्हा मला माहित होते की यामुळे काही लोक नाराज होतील. माझी ही टिप्पणी खासगी नव्हती. ते चारही गोलंदाज माझे चांगले मित्र आहेत.” क्लार्कच्या एकूणच वक्तव्याचा विचार केला असता, त्यातून असे स्पष्टपणे जाणवते की त्याच्यामते ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना देखील बॉल टेंपरींगच्या घटनेबद्दल बऱ्याच प्रमाणात माहिती होती.

दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की बॅनक्रॉफ्टने नुकतेच हे मोठे विधान केल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड आणि नॅथन लियॉन हे बॉल टेंपरींगच्या वादात ओढले गेले. यानंतर चारही गोलंदाजांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

केपटाऊन कसोटीतील त्या चारही गोलंदाजांनी म्हटले की, “आम्हाला आमच्या ईमानदरीवर गर्व आहे. हे निराशाजनक आहे की काही पत्रकार व माजी खेळाडू याबद्दल वेगवेगळे भाष्य करत आहेत. आम्ही अनेक वेळा या मुद्यासंदर्भात आमची भूमिका स्पष्ट केली आहे.” दरम्यान हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की, या संपूर्ण प्रकरणा बद्दल आगामी काळात कशाप्रकारच्या हालचाली घडतात.

महत्त्वाच्या बातम्या-

ट्वेंटी ट्वेंटीत एकही शतक न झळकावता ‘या’ फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस, धोनीचाही समावेश

श्रीलंकाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी दिग्गजाने निवडला भारतीय संघ, फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूवर लावला मोठा डाव

फिट अँड फाईन… जिममध्ये घाम गाळत ‘जड्डू’ इंग्लंड दौरा गाजवण्यास होतोय सज्ज; बघा सरावाचा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---