आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संघांची तयारी सुरु झाली आहे. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाने १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान सराव शिबिरही आयोजित केले आहे. यासाठी संघातील अनेक खेळाडू चेन्नईला पोहचले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे.
धोनी आयपीएल २०२० मधून जवळपास दीड वर्षांनंतर मैदानावर खेळताना चाहत्यांना दिसणार आहे. तो शेवटचे जुलै २०१९मध्ये विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा धोनीला मैदानावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यावेळी धोनी आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. कारण चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी धोनी आयपीएल २०२०मध्ये चौथ्या क्रमांकासाठी उत्तम पर्याय असल्याचे म्हटले आहे.
न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना हसी म्हणाले, ‘ चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी धोनी योग्य वाटत आहे. पण मधल्या फळीमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची आवश्यकता आहे. पण अजूनही फलंदाजी क्रमवारी काय असेल याची खात्री नाही. पण सध्या केवळ तयारी़वर लक्ष केंद्रित केले.’
धोनी बऱ्याचदा तळातल्या फळीत फलंदाजी करताना दिसतो. पण आता कदाचीत त्याला मधल्या फळीत संधी मिळण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्स संघात धोनी व्यतिरिक्त शेन वॉट्सन, हरभजन सिंग, इम्रान ताहिर, रविंद्र जेडेजा, सुरेश रैना, ड्वेन ब्रावे, फाफ डु प्लेसिस, मुरली विजय, मिशेल सँटेनर असे अनेक अनुभवी खेळाडू आहे. तर दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, सॅम करन, ऋतुराज गायकवाड असे युवा खेळाडू देखील आहेत.
संघाबद्दल हसी म्हणाले, ‘मैदानात जाऊन मेहनत घ्यायची आहे. आम्ही सुदैवी आहोत की आमच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत, जे खेळाला उत्तमप्रकारे जाणतात. त्यांना कशी तयारी करायची आणि आव्हानासाठी कसे तयार रहायचे हे माहित आहे. नक्कीच आमची फलंदाजी आमची ताकद आहे, पण मला वाटते आमचा संघ संतुलित आहे. लोकं विचार करतात तसे संघबांधणी करणे तितके सोपे नाही. प्रत्येक खेळाडूने वातावरणाशी जुळवून घ्यायला पाहिजे.’
चेन्नई सुपर किंग्स संघ २० ऑगस्टला सराव शिबिर संपल्यानंतर २१ ऑगस्टला युएईला रवाना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पाकिस्तानी कर्णधाराला बॉल आउटचा नियमच माहित नव्हता; भारतीय अष्टपैलू खेळाडूचा खुलासा
-इम्रान खान स्वत:ला देव समजतोय; त्याला मी पंतप्रधान केलंय, माजी क्रिकेटर कडाडला
ट्रेंडिंग लेख-
-वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे २ संघ
-कोण होणार कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० चा किंग?
-भारताच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेले ३ भारतीय क्रिकेटपटू





